भारताच्या परकीय चलनामध्ये घट...

भारताच्या रेटिंगवर परिणाम न होण्यामागे परकीय चलन साठा हे एक महत्त्वाचे कारण
RBI

RBI

Dainik Gomantak

Published on
Updated on

भारताच्या परकीय चलन (Foreign currency) सलग तिसऱ्या आठवड्यात घट झाली आहे. परकीय चलन मालमत्तेत घट झाल्यामुळे गंगाजळीत घट नोंदवली गेली होती, गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर या आठवड्यात सोन्याच्या साठ्यात वाढ झाली आहे.

भारताचा परकीय चलनाचा साठा

रिझर्व्ह बँकेने (RBI) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 10 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 77 डॉलर दशलक्षने घसरून $635.828 अब्ज झाला आहे. मागील आठवड्यात परकीय चलनाचा साठा 1.783 डॉलर अब्जने घसरून 635.905 डॉलर अब्ज झाला. परकीय चलन मालमत्तेत या आठवड्यातील सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली. या आठवड्यात मालमत्ता $321 दशलक्षने घसरली. तथापि, या काळात सोन्याच्या (gold) साठ्याचे मूल्य 291 डॉलर दशलक्षने वाढले. या कालावधीत, SDR मधील राखीव स्थिती 37 डॉलर दशलक्ष आणि IMF मध्ये 10 डॉलर दशलक्षने कमी झाली आहे.

<div class="paragraphs"><p>RBI</p></div>
नोटबंदी यशस्वीच! डिजीटायजेशन, परकीय गुंतवणीकत मोठी वाढ

कोविडच्या काळात साठा वाढला

देशाच्या परकीय ताज्या आकडेवारीत घट झाली असली तरी, अजूनही उच्च पातळीवर आहे. कोविडच्या (Covid 19) काळापासून देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. 3 सप्टेंबर, 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात, देशाच्या परकीय चलनाचा साठा $642.453 अब्ज इतका सर्वकालीन उच्चांक गाठला होता.

देशाचा सध्याचा साठा दीड वर्षांहून अधिक काळातील आयात गरजा भागवण्यासाठी पुरेसा आहे. जगभरातील अनेक मोठ्या ब्रोकिंग एजन्सींनी कोविडच्या दबावादरम्यान भारताच्या उच्च चलन साठ्याला मोठी सुरक्षा म्हणून वर्णन केले आहे.

अर्थव्यवस्थांच्या (economies) दबावादरम्यान, भारताच्या रेटिंगवर परिणाम न होण्यामागे परकीय चलन साठा हे एक महत्त्वाचे कारण होते. वर्ष 2004 मध्ये, भारताच्या परकीय चलनाच्या साठ्याने प्रथमच $100 अब्जचा टप्पा ओलांडला होता, तर जून 2020 च्या पहिल्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्याने $500 अब्जचा टप्पा ओलांडला होता. परकीय चलन साठा जूनपासून सातत्याने $500 अब्जच्या वर राहिला आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com