Vande Bharat Train: वंदे भारत या स्वदेशी बुलेट ट्रेनचा सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला आहे. गुजरातमध्ये शुक्रवारी सलग दुसऱ्यांदा गुरे ट्रेनला धडकली. या अपघातात ट्रेनच्या पुढील भागाचे पुन्हा किरकोळ नुकसान झाले आहे. गांधीनगरहून मुंबईला जात असताना कंझरी आणि आनंद स्थानकादरम्यान हा अपघात झाला. एक दिवसापूर्वी मणिनगर स्थानकाजवळ म्हशींच्या कळपाला रेल्वेची धडक झाली होती. दुरुस्तीनंतर ही गाडी आज पुन्हा रुळावर आणण्यात आली होती.
दरम्यान, गुजरातमधील (Gujarat) आनंद स्टेशनजवळ ट्रेन एका गायीला धडकली, त्यामुळे ट्रेनच्या पुढच्या भागाचे किरकोळ नुकसान झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी 3.48 वाजता मुंबईपासून (Mumbai) 432 किमी अंतरावर असलेल्या आनंदमध्ये ही घटना घडली. या घटनेला दुजोरा देताना पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर म्हणाले की, "गाडीच्या पुढील भागाचे किरकोळ नुकसान झाले आहे." ते पुढे म्हणाले की, 'सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.'
प्राणी मालकांवर गुन्हा
गुजरातमध्ये गुरुवारी सकाळी वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ट्रेनने म्हशींच्या कळपाला धडक दिल्याप्रकरणी रेल्वे संरक्षण दलाने (RPF) या गुरांच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पश्चिम रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, 'मुंबईत म्हशींच्या कळपाला ट्रेन धडकल्यानंतर झालेल्या नुकसानीची दुरुस्ती करण्यात आली आहे. या अपघातात चार म्हशींचा मृत्यू झाला.'
दुसरीकडे, पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ प्रवक्ते (Ahmedabad Division) जितेंद्र कुमार जयंत म्हणाले की, "आरपीएफने अहमदाबादमधील (Ahmedabad) वाटवा आणि मणिनगर रेल्वे स्थानकांदरम्यान वंदे भारत ट्रेनच्या मार्गावर येणाऱ्या म्हशींच्या अज्ञात मालकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे."
कमी क्षमतेने ट्रेन धावते
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 30 सप्टेंबर रोजी गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या सेमी-हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या नवीन आणि अपग्रेड वर्जनला हिरवा कंदील दाखवला होता. देशातील ही तिसरी वंदे भारत ट्रेन आहे. ही ट्रेन ताशी 180 किमी वेगाने धावू शकते, परंतु सध्या कमाल वेग 130 किमी प्रतितास ठेवण्यात आला आहे. गांधीनगर ते मुंबई दरम्यानची ट्रेन सुमारे साडेसहा तासांत हा दुसरा भाग व्यापते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.