Vande Bharat Express: मुंबई-गांधीनगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा अपघात

Vande Bharat Express: मुंबई सेंट्रल ते गुजरातमधील गांधीनगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला गुरुवारी अपघात झाला.
Vande Bharat Train
Vande Bharat TrainTwitter/ @ANI
Published on
Updated on

Vande Bharat Express Met With an Accident: मुंबई सेंट्रल ते गुजरातमधील गांधीनगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला गुरुवारी अपघात झाला. वटवा स्टेशन ते मणिनगर दरम्यान रेल्वे मार्गावर म्हशींचा कळप आल्याने सकाळी 11.15 च्या सुमारास हा अपघात झाला. ट्रेनच्या इंजिनच्या पुढील भागाचे नुकसान झाले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ पीआरओ जेके जयंती यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, 30 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी या ट्रेनला हिरवा कंदील दाखवला होता. त्यांनी गांधीनगर येथून ट्रेनला हिरवा कंदील दाखवला होता. अहमदाबाद रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 9 वरुन ही ट्रेन दुपारी 2 वाजता सुटली आणि संध्याकाळी 7.30 वाजता मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. नवीन 'वंदे भारत एक्सप्रेस' सेमी-हाय स्पीड ट्रेनने अहमदाबाद (Ahmedabad) ते मुंबई (Mumbai) दरम्यानचे 492 किमीचे अंतर साडेपाच तासांत कापले.

Vande Bharat Train
खूशखबर! Vande Bharat Train मधून प्रवास करत असाल तर द्यावे लागणार इतके भाडे

वंदे भारत ट्रेनच्या मालिकेतील ही तिसरी ट्रेन

महाराष्ट्र आणि गुजरातच्या राजधान्यांना जोडणारी ही ट्रेन वंदे भारत ट्रेनच्या मालिकेतील तिसरी ट्रेन आहे. या मालिकेतील पहिली ट्रेन नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान तर दुसरी ट्रेन नवी दिल्ली ते माता वैष्णो देवी, कटरा दरम्यान सुरु करण्यात आली.

Vande Bharat Train
Vande Bharat: मुंबई-गांधीनगर दरम्यान धावणार 'वंदे भारत एक्सप्रेस', PM मोदी...

दुसरीकडे, गांधीनगर-मुंबई वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांसाठी सुरु झाली. रविवार वगळता आठवड्यातून सहा दिवस ही ट्रेन चालणार आहे. ही ट्रेन मुंबई सेंट्रल स्टेशनवरुन सकाळी 6.10 वाजता सुटते आणि दुपारी 12.30 वाजता गांधीनगरला पोहोचते. त्यानंतर ही ट्रेन गांधीनगर येथून दुपारी 2.05 वाजता सुटते आणि मुंबई सेंट्रलला रात्री 8.35 वाजता पोहोचते. ही ट्रेन सुरत, वडोदरा आणि अहमदाबाद स्टेशनवर थांबते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com