AIS: नवीन आयकर पोर्टलवरून असे करा डाउनलोड

आयकर विभागाच्या नवीन सुविधेनुसार करदाते आता इ-फायलिंग पोर्टलवर (Portal) त्यांचे उत्पन्न, गुंतवणूक आणि करांचे वार्षिक माहिती विवरण ऍक्सेस करू शकतात.
AIS नवीन आयकर पोर्टलवरून असे करा डाउनलोड

AIS नवीन आयकर पोर्टलवरून असे करा डाउनलोड

Dainik Gomantak

Published on
Updated on

आयकर विभागाने नुकतीच एक नवीन सुविधा सुरु केली आहे. या अंतर्गत, करदाते आता इ-फायलिंग पोर्टलवर (Portal) त्यांचे उत्पन्न, गुंतवणूक आणि करांचे वार्षिक माहिती विवरण ऍक्सेस करू शकतात. आयकर पोर्टलवरून ते घरबसल्या सहजपणे डाउनलोड (Download) करता येते. 31 डिसेंबर हि टॅक्स (Tax) रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे. यामुळे तुमचा AIS तपासा जेणेकरून कोणतीही चूक राहणार नाही. यामध्ये काही तफावत आढळल्यास किंवा काही चूक दिसल्यास आयकर (Income tax) विभागाला नक्की कळवा.

AIS अशा प्रकारे डाउनलोड होईल

* सर्वातआधी इ-फायलिंग https://www.incometax.gov.in या पोर्टलला भेट द्या

* आता पण कार्ड, आधार कार्ड किंवा युजर आयडीने लॉगिन करा.

* आता सर्व विभागात वार्षिक माहिती प्रणाली वर क्लिक करा.

* पीडीएफ फॉरमॅटमध्ये एआयएस डाउनलोड करण्यासाठी, पीडीएफ पर्याय निवडा आणि डाउनलोड वर क्लिक करा.

* आता AIS ची PDF उघडा आणि पासवर्ड म्हणून तुमचे पण कार्ड आणि जन्म तारीख टाका

<div class="paragraphs"><p>AIS नवीन आयकर पोर्टलवरून असे करा डाउनलोड</p></div>
भारताच्या परकीय चलनामध्ये घट...

AIS काय आहे

हे एक सर्वसमावेशक विधान आहे, ज्यामुळे तुम्ही आर्थिक वर्षात केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांचा तपशील असतो. नवीन AIS मध्ये पगार (Salary) आणि इतर मार्गाने मिळणारे उत्पन्न, बचत खात्यातील व्याज आणि FD, लाभांश, सिक्युरिटीज व्यवहार म्युच्युअल फंड इत्यादीशी संबंधित माहिती आहे. यासह त्यात TDS, TCS आणि कर मागणी किंवा परतावा संबंधित माहिती देखील आहे. हे दोन भागात असते. पहिल्या भागात पॅन , आधार क्रमांक, करदात्याचे नाव, जन्मतारीख इत्यादी सामान्य माहिती असते. दुसऱ्या भागात उत्पन्न ,गुंतवणूक आणि कर यासंबंधित माहिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com