Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

UIDAI New SOP For Aadhaar Name Update: युनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने नागरिकांच्या सुविधेसाठी आणि आधार प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नावामध्ये सुधारणा किंवा बदल करण्यासाठी एक नियमावली जारी केली.
UIDAI New SOP For Aadhaar Name Update
Aadhaar Card New RuleDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

UIDAI New SOP For Aadhaar Name Update: युनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने नागरिकांच्या सुविधेसाठी आणि आधार प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नावामध्ये सुधारणा किंवा बदल करण्यासाठी एक नियमावली जारी केली. ही नवीन व्यवस्था आता लागू झाली असून, नाव बदलाच्या प्रक्रियेला चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागण्यात आले, जेणेकरुन लोकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागणार नाही आणि काम वेळेत पूर्ण होईल.

पहिल्या श्रेणीमध्ये लहान-सहान चुकांचा समावेश होतो. यामध्ये नावाचे स्पेलिंग, इनिशिअल्स पूर्ण किंवा छोटे करणे, मधले किंवा आडनाव जोडणे किंवा काढणे, शब्दांचा क्रम बदलणे किंवा नावामधील डॉट काढणे यांसारख्या गोष्टी येतात. या प्रकारच्या बदलांसाठी आधार सेवा केंद्रावर फक्त एक वैध ओळखपत्र द्यावे लागते.

UIDAI New SOP For Aadhaar Name Update
Aadhaar SIM Card Link: तुमच्या नावावर किती SIM चालू आहेत? या सोप्या पद्धतीनं लगेच चेक करा

दुसऱ्या श्रेणीनुसार, विवाह (Marriage) किंवा घटस्फोटानंतर नाव किंवा सरनेम बदलायचे असल्यास ओळखपत्रासोबत 'ॲनेक्झर डी' हे सादर करणे बंधनकारक आहे. याद्वारे हे स्पष्ट होते की, हा बदल केवळ वैवाहिक स्थितीमुळे झाला आहे आणि मूळ ओळख तीच आहे. जेंडर चेंज किंवा नवजात बालकांच्या नावामध्ये बदल करण्यासाठीही यात विशेष तरतुदी आहेत.

UIDAI New SOP For Aadhaar Name Update
DEADLINE ALERT! फक्त 31 डिसेंबरपर्यंत वेळ! लगेच करा 'हे' काम, नाहीतर तुमचं 'PAN Card' होईल बंद

तिसऱ्या श्रेणीमध्ये डेटा-एंट्रीची चूक येते. अर्ज भरताना कागदपत्रे बरोबर देऊनही केंद्रावरील कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे नावात स्पेलिंग मिस्टेक झाल्यास, वयानुसार ॲनेक्झर बी किंवा ॲनेक्झर सी यांसारखे हलफनामा आणि ओळखपत्र देऊन ही चूक सुधारता येते. चौथ्या आणि अंतिम श्रेणीनुसार, जर एखादी व्यक्ती आपली मूळ ओळख बदलून संपूर्ण नावच बदलत असेल, तर अशा 'मेजर नेम चेंज'साठी सरकारी राजपत्र आणि वैध ओळखपत्र जमा करणे अनिवार्य करण्यात आले.

UIDAI New SOP For Aadhaar Name Update
Ration Card Link To Aadhaar: रेशन आणि आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, मोदी सरकारने..!

नावामध्ये बदल करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या जवळच्या आधार सेवा केंद्रावर जावे लागते. तिथे बदलाच्या वर्गवारीनुसार योग्य तो फॉर्म आणि कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करुन डेमोग्राफिक अपडेटसाठी ठरवून 75 रुपयांचे शुल्क भरावे लागते. पावतीवर दिलेल्या युआरएन क्रमांकाद्वारे अर्जाचे स्टेटस ऑनलाईन ट्रॅक करता येते. केंद्रावर जाण्यापूर्वी आपल्या बदलाची वर्गवारी नीट समजून घेतल्यास आणि योग्य कागदपत्रे तयार ठेवल्यास अर्ज फेटाळण्याची शक्यता पूर्णपणे संपते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com