7th Pay Commission: नवीन वर्षापूर्वी सरकारने दिली गूड न्यूज, डीएमध्ये केली इतकी टक्के वाढ!
DA DR Hike: त्रिपुरा सरकारने नवीन वर्षाच्या आधी राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठी बातमी दिली आहे. या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) मध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) मध्ये 12 टक्के वाढ जाहीर केली आहे. सरकारने केलेल्या या घोषणेमुळे राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक खूश आहेत.
ही दरवाढ 1 डिसेंबरपासून लागू होणार आहे
सरकारने केलेली ही वाढ 1 डिसेंबरपासून लागू होणार आहे. म्हणजेच, 31 डिसेंबरला मिळणार्या कर्मचार्यांचा पगार 20 टक्के डीएसह येईल. या वाढीमुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा भत्ता 8 टक्क्यांवरुन 20 टक्के झाला आहे. पत्रकार परिषदेत साहा म्हणाले की, 'या निर्णयामुळे 1,04,600 कर्मचारी आणि 80,800 पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. अस्थायी कर्मचाऱ्यांसाठीही सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. त्यात सरकारने वाढ करुन त्यांचे मानधन जवळपास दुप्पट केले आहे.
राज्य सरकारने वेतन रचनेत सुधारणा केली
डीए/डीआरमध्ये 12 टक्क्यांनी वाढ केल्यास राज्य सरकारवर दरमहा 120 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल, असेही मुख्यमंत्री साहा म्हणाले. वार्षिक आधारावर हा 1,440 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार आहे. साहा पुढे म्हणाले की, 'संसाधनांचा तुटवडा असतानाही राज्य सरकारने (Government) वेतन रचनेत सुधारणा केली आहे. याचा फायदा लाखो कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे.' ईशान्येत फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
याशिवाय, केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Employees) आणि पेन्शनधारकांनाही नवीन वर्षात डीए आणि डीआर वाढीची भेट मिळणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 38 टक्के आहे. आगामी काळात सरकार त्यात 4 टक्क्यांनी वाढ करु शकते. यासह ते 42 टक्क्यांपर्यंत वाढेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.