7th Pay Commission: नवीन वर्षापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, DA मध्ये 4 टक्के वाढ

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षापूर्वीच सरकारने कर्मचाऱ्यांना मोठा लाभ दिला आहे.
7th Pay Commission Update | 7th Pay Commission News | DA Hike News
7th Pay Commission Update | 7th Pay Commission News | DA Hike NewsDainik Gomantak
Published on
Updated on

DA Hike News: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षापूर्वीच सरकारने कर्मचाऱ्यांना मोठा लाभ दिला आहे. खरं तर, मेघालय सरकारने राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्यात (Dearness Allowance) 4 टक्के वाढ मंजूर केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, महागाई भत्त्यात ही वाढ जुलै 2022 पासून लागू होणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ

सरकारच्या या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांचा डीए जुलै 2022 पासून 28 टक्क्यांवरुन 32 टक्के झाला आहे. वास्तविक, यापूर्वी 29 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने (Central Government) महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली होती. आता 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 62 लाख पेन्शनधारकांच्या खात्यात 38 टक्के दराने डीए येऊ लागला आहे.

7th Pay Commission Update | 7th Pay Commission News | DA Hike News
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका, आता महागाई भत्त्यावर भरावा लागणार कर

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवला

विशेष म्हणजे, याआधी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या (Employees) महागाई भत्त्यात वाढ केली होती. एवढेच नाही तर आतापर्यंत आलेले AICPI चे आकडे पाहता नवीन वर्षात म्हणजेच 2023 च्या जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 38 टक्के महागाई भत्ता मिळतो. केंद्र सरकारशिवाय अनेक राज्य सरकारांनीही महागाई भत्त्यात वाढ केली आहे. यामध्ये झारखंड (Jharkhand), छत्तीसगड, हरियाणा, यूपी, कर्नाटक, पंजाब, आसाम इ. आता मेघालय सरकारने हा निर्णय घेतला आहे.

7th Pay Commission Update | 7th Pay Commission News | DA Hike News
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, PM मोदी करणार मोठी घोषणा!

तसेच, सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव पगार आणि पेन्शनचा लाभ मिळणार आहे. यासोबतच येत्या वर्षात म्हणजेच 2023 मध्येही कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव भत्त्याची रक्कम येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com