गेल्या महिनाभरात टोमॅटोचे (tomato) भाव 29 टक्क्यांनी घसरले आहेत तर टोमॅटोचे भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा खर्च भागवणे मात्र कठीण झाले आहे. तामिळनाडूमध्ये एकही व्यापारी बाजारात 3 रुपये किलोने टोमॅटो घेण्यास तयार नाहीये. (Tomato Rate Inflation brings relief to consumers but farmers suffer)
कोईम्बतूरच्या किनाथुकडावू भाजी मंडईत टोमॅटो विकण्यासाठी आलेल्या शेतकर्यांनी त्यांचे पीक विकले नाही तेव्हा त्यांना जबरदस्तीने महामार्गावर ते टोमॅटो टाकावे लागले तर सुमारे एक टन टोमॅटो महामार्गावर विखुरले होते. बाजारात 15 किलो वजनाच्या टोमॅटोच्या एका क्रेटचा दर 50 रुपये असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे आणि एवढेच नाही तर या भावातही सर्वच शेतकऱ्यांचे टोमॅटो विकले जात नसल्याने त्यांना मजबुरीने आपले पीक फेकून द्यावे लागत आहेत.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
मंडईत पीक विकण्यासाठी आलेले शेतकरी पेरियासामी यांनी सांगितले की एक एकर टोमॅटोचे पीक तयार करण्यासाठी 75,000 रुपये खर्च येतो. बाजारात टोमॅटो 15 रुपये किलोने विकला गेला तर शेतकऱ्याचा खर्च भागतो मात्र आता एकही व्यापारी बाजारात टोमॅटो खरेदी करण्यास तयार नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांकडे टोमॅटो टाकण्याशिवाय पर्याय नाहीये.
धर्मपुरीमध्ये टोमॅटोची बंपर लागवड
कोईम्बतूरच्या धर्मापुरी भागामध्ये अनुकूल हवामानामुळे यावेळी टोमॅटोची बंपर लागवड झाली आहे. धर्मपुरीमध्ये 9,300 एकरवर टोमॅटोची लागवड करण्यात येते. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 60 टनांहून अधिक उत्पादन होत असते. या वर्षी टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते आणि भाव वाढल्याने टोमॅटोच्या लागवडीखालील क्षेत्रही वाढले आहे.
टोमॅटो स्वस्त होत आहेत,
ग्राहक मंत्रालयाने सांगितले की, एका महिन्यात टोमॅटोच्या किमती सुमारे एक तृतीयांश कमी झाल्या आहेत, तर कांद्याचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 टक्के स्वस्त झाले आहेत. मंगळवारी देशभरात टोमॅटोचा सरासरी भाव 37.35 रुपये प्रतिकिलो राहिला, जो एका महिन्यापूर्वी 52.5 रुपये प्रति किलो एवढा होता. मान्सूनच्या पावसानंतर नवीन पीक घेण्याच्या तयारीमुळे भावामध्ये ही घसरण झाली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.