Toll Tax: हायवेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठे अपडेट, या लोकांना भरावा लागणार नाही टोल टॅक्स?

Toll Tax News: काही लोकांना सरकारकडून टॅक्समध्ये सूट मिळेल.
Toll Tax
Toll TaxDainik Gomantak
Published on
Updated on

Toll Tax Rules: तुम्हीही हायवेवर प्रवास करणार असाल किंवा प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नुकताच एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोकांना सरकारकडून टॅक्समध्ये सूट मिळेल. म्हणजेच, त्यांना टोल टॅक्स भरावा लागणार नाही, असे सांगण्यात येत आहे.

पीआयबीने ट्विट केले

पीआयबीने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये म्हटले की, एका व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, पत्रकारांना भारतातील (India) सर्व टोल प्लाझावर टोल टॅक्समध्ये (Toll Tax) सूट मिळेल, ज्यासाठी त्यांना ओळखपत्र दाखवणे आवश्यक असेल.

Toll Tax
Nitin Gadkari On Toll: गडकरींनी केली मोठी घोषणा, वाहनचालकांचे पुन्हा बल्ले-बल्ले

पूर्णपणे खोटा दावा

पीआयबीने तथ्य तपासणीनंतर हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सांगितले आहे. MORTHIndia ने असा कोणताही आदेश दिलेला नाही.

अधिकृत लिंक तपासा

याविषयी अधिक माहितीसाठी, तुम्ही https://morth.nic.in/sites/default/files/faqs_exemptions.pdf या अधिकृत लिंकला भेट देऊ शकता.

Toll Tax
Indian Railways: वंदे भारतच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी, रेल्वेमंत्र्यांनी केली 'ही' घोषणा

टोल टॅक्समध्ये कोणाला सूट मिळते?

PIB ने एक लिंक शेअर केली आहे, ज्यामध्ये भारतात टोल टॅक्समधून कोणाला सूट देण्यात आली आहे, याची माहिती देण्यात आली आहे. त्यात भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, लोकसभा, राज्यसभा अध्यक्ष आणि खासदार इत्यादींचा समावेश आहे. यासोबतच रुग्णवाहिकेलाही टोल टॅक्समधून सूट देण्यात आली आहे.

तुम्ही तथ्य तपासणी देखील करु शकता

सोशल मीडियाच्या जमान्यात काही वेळा चुकीच्या बातम्या व्हायरल होऊ लागतात. तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटवर किंवा व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या बातम्यांबाबत तुम्हाला शंका असल्यास, तुम्ही पीआयबीद्वारे तथ्य तपासू शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल. याशिवाय, तुम्ही WhatsApp क्रमांक 8799711259 किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर माहिती पाठवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com