Toll Tax: टोल टॅक्सबाबत गडकरींनी घेतला आणखी एक मोठा निर्णय, वाहनचालकांना लागली लॉटरी!

Toll Tax News: आता टोल टॅक्सबाबत सरकारकडून आणखी एक मोठी योजना आखली जात असून, त्यानंतर महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
Nitin Gadkari
Nitin GadkariDainik Gomantak
Published on
Updated on

Toll Tax News: देशभरातील टोल टॅक्सबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक बदल केले आहेत. आता टोल टॅक्सबाबत सरकारकडून आणखी एक मोठी योजना आखली जात असून, त्यानंतर महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

केंद्र सरकार लवकरच बॅरियररहित टोलवसुली प्रणाली (Barrier-Less Toll System) सुरु करण्याचा विचार करत आहे. याची अंमलबजावणी झाल्यास वाहनचालकांना अर्धा मिनिटही टोल नाक्यावर थांबावे लागणार नाही.

चाचणी सुरु आहे

बुधवारी ही माहिती देताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री व्ही के सिंह म्हणाले की, 'बॅरियररहित टोल वसुली यंत्रणेची चाचणी सध्या सुरु आहे. चाचणी यशस्वी होताच आम्ही लवकरच त्याची अंमलबजावणी करु.'

Nitin Gadkari
Toll Tax Rules: नितीन गडकरींची मोठी घोषणा, टोल टॅक्सच्या नियमात बदल होणार; FASTag मधून...

कमी प्रवास वेळ

सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, प्रवास केलेल्या अंतराच्या आधारे टोल भरण्याची व्यवस्थाही लागू केली जाईल. टोलवसुलीची नवी यंत्रणा कार्यान्वित झाल्यास तिची कार्यक्षमता वाढेल आणि प्रवासाचा वेळही कमी होईल.

ते पुढे म्हणाले की, वाहनांमध्ये FASTag वापरल्याने टोल बुथवर लागणारा वेळ 47 सेकंदांवर आला आहे, परंतु सरकारला (Government) तो आणखी कमी करुन 30 सेकंदांपेक्षा कमी करायचा आहे.

कॅमेरा आधारित तंत्रज्ञान वापरले जात आहे

यासाठी दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर पायलट (प्रायोगिक) चाचणी सुरु आहे, ज्यामध्ये उपग्रह आणि कॅमेरा आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

सिंह यांनी सांगितले की, जेव्हा तुम्ही महामार्गावर प्रवेश करता आणि तिथे बसवण्यात आलेला कॅमेरा तुमच्या वाहनाचा नोंदणी क्रमांक स्कॅन करतो, त्यानंतर त्या आधारे तुम्ही टोल बुथपर्यंत पोहोचण्यासाठी किती किलोमीटरचा प्रवास केला आहे, हे कळू शकते.

Nitin Gadkari
Income Tax Return: खूशखबर! जुन्या कर प्रणालीतून ITR भरणाऱ्यांना मिळणार 'या' 6 महत्त्वाच्या सूट, जाणून घ्या

पेमेंट टोलच्या नियमांवर आधारित असेल

सध्याच्या व्यवस्थेपेक्षा हे वेगळे आहे, ज्यामध्ये तुम्ही महामार्गावरुन किती किलोमीटरचा प्रवास केला याच्याशी काहीही संबंध नाही, असे त्यांनी म्हटले आहे. हे पेमेंट टोलच्या नियमांवर आधारित आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी ही माहिती दिली

दूरसंचार क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात सध्याच्या सरकारने केलेल्या कामामुळेच अशी प्रगती होत असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले. ते पुढे म्हणाले की, दूरसंचार नेटवर्कमधील सुधारणांमुळे टोल प्लाझावर वाहनांचा डेटा गोळा करण्यात मदत होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com