
Goa Petrol Diesel Prices
पणजी: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झालीय. यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला आहे. चेन्नई वगळता देशातील चार प्रमुख महानगरांपैकी तीनमध्ये इंधनाचे दर स्थिर आहेत. गोव्यात देखील इंधनाच्या दरात मोठा बदल झालेला नाही. गोव्यातील पेट्रोल - डिझेले आणि सीएनजीच्या दरात किरकोळ बदल झाला आहे.
देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. त्यानुसार काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतात तर काही ठिकाणी त्यांच्या किमती वाढतात. पेट्रोल आणि डिझेलच्या या किमती रोज सकाळी 6 वाजता अपडेट केल्या जातात.
प्रमुख चार शहरातील इंधनाचे दर
दिल्लीत पेट्रोलचा दर 94.72 रुपये आणि डिझेलचा दर 87.62 रुपये प्रति लिटर आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर 103.44 रुपये तर डिझेलचा दर 89.97 रुपये प्रतिलिटर आहे.
कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 103.94 रुपये आणि डिझेलचा दर 90.76 रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 100.85 रुपये आणि डिझेलचा दर 92.44 रुपये प्रति लिटर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.