Tim Cook: ‘’ॲपलच्या भारतातील कामगिरीवर खूप खूश, प्रतिस्पर्धी म्हणून राहण्यासाठी...’’

Tim Cook: ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी कंपनीच्या भारतातील कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
Tim Cook|Apple|iPhone
Tim Cook|Apple|iPhoneDainik Gomantak

Tim Cook: ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी कंपनीच्या भारतातील कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने भारतात विक्रमी कमाई केली आहे. तथापि, या कालावधीत Apple च्या एकूण महसूलात 4% घट झाली आहे. आयफोनच्या विक्रीतही 10% घट झाली आहे.

टीम कुक म्हणाले की, "आम्ही भारतातील कामगिरीबद्दल खूश आहोत. मार्च तिमाहीत डबल डिजीट ग्रोथची नोंद झाली. आमच्यासाठी मार्च तिमाहीच्या महसुलाचा हा एक नवीन रेकॉर्ड आहे.’’

ऍपलचे मुख्य वित्तीय अधिकारी लुका माएस्ट्री म्हणाले की, "आम्ही विशेषत: उदयोन्मुख बाजारपेठेतील आमच्या कामगिरीबद्दल खूश आहोत. आम्ही लॅटिन अमेरिका, मध्य पूर्व, भारत, इंडोनेशिया (Indonesia), यासह अनेक देशांमध्ये पहिल्या सहामाहीत रेकॉर्ड ब्रेक महसूलात वाढ नोंदवली आहे. फिलीपिन्स आणि तुर्कीनेही रेकॉर्ड केला आहे.’’

Tim Cook|Apple|iPhone
Flipkart Valentine Week Sale: फ्लिपकार्टचा व्हॅलेंटाईन वीक स्पेशल सेल, iPhone सह विविध स्मार्टफोन्सवर मोठी सूट

टीम कुक म्हणाले की, ‘’ॲपल प्रतिस्पर्धी म्हणून राहण्यासाठी भारतात (India) आयफोनचे उत्पादन करत आहे. त्याचबरोबर भारतीय बाजारपेठेतील कंपनीची वाढ त्याच्या ऑपरेशनल विस्ताराशी जोडलेली आहे.’’

ते पुढे म्हणाले की, ‘’व्यावहारिक दृष्टिकोनातून, प्रतिस्पर्धी होण्यासाठी तिथे (भारतात) उत्पादन करण्याची गरज आहे. आम्ही भारतीय बाजारपेठेत पोहोचलो आहोत आणि आवश्यक पावलेही उचलत आहोत. अलिकडच्या वर्षांत Apple चीनच्या बाहेर त्यांची उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दिशेने काम करत आहे. भारताव्यतिरिक्त, इतर अनेक दक्षिण आशियाई बाजारपेठांमध्ये हे लक्ष्य घेऊन काम करत आहे.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com