Flipkart Valentine Week Sale: फ्लिपकार्टचा व्हॅलेंटाईन वीक स्पेशल सेल, iPhone सह विविध स्मार्टफोन्सवर मोठी सूट

Flipkart Valentine Week Sale: मर्यादित काळासाठी असलेल्या या सेलमध्ये iPhone 15 ची किंमत 65,999 रुपये झाली आहे.
Flipkart Valentine's Week Sale 2024
Flipkart Valentine's Week Sale 2024Dainik Gomantak

Flipkart Valentine's Week Sale 2024

फ्लिपकार्टने व्हॅलेंटाईन वीक स्पेशल सेलची घोषणा केली आहे. मोबाईल बोनान्झा नावाने सुरु केलेल्या या सेलमध्ये iPhone 15 सह अनेक लोकप्रिय स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जात आहे.

मर्यादित काळासाठी असलेल्या या सेलमध्ये iPhone 15 ची किंमत 65,999 रुपये झाली आहे. याशिवाय सॅमसंग, रियलमी आणि मोटोरोला फोनवरही चांगली ऑफर आहे.

फ्लिपकार्ट व्हॅलेंटाईन वीक स्पेशल सेल 9 ते 15 फेब्रुवारी दरम्यान सुरु राहणार आहे.

Flipkart च्या सेल ऑफरनुसार iPhone 15 चे 128GB स्टोरेज व्हेरिएंट Rs 65,999 मध्ये खरेदी करता येईल. यासाठी 11,901 रुपयांची सूट देण्यात आली आहे. तसेच, तुम्ही जर पेमेंटसाठी BOB कार्ड वापरत असल्यास, खरेदीवर तुम्हाला 10 टक्के सवलत मिळवू शकते.

Flipkart BOB कार्डसह EMI पर्यायांवर 10 टक्के आणि Citi-ब्रँडेड क्रेडिट कार्ड EMI पेमेंटवर 10 टक्के सूट देखील देत आहे.

Flipkart Axis Bank कार्ड वापरकर्त्यांना 5 टक्के अतिरिक्त कॅशबॅक देत आहे. तथापि, तुम्ही तुमचा जुना आयफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला ट्रेड-इनवर 54,900 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

तुम्ही ज्या फोनमध्ये ट्रेडिंग करत आहात त्या फोनची स्थिती आणि मॉडेल यावर ते अवलंबून असते. सोप्या शब्दात, तुम्ही तुमच्या जुन्या iPhone 13 चे ट्रेड करून 26,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.

Samsung Galaxy S21 FE 5G

फ्लिपकार्ट व्हॅलेंटाईन वीक स्पेशल सेलमध्ये सॅमसंगचे फोन अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहेत. फ्लिपकार्ट फोनवर 57 टक्के सवलत देत आहे, त्यानंतर तुम्ही फक्त 29,999 रुपयांमध्ये हा फोन खरेदी करु शकता.

सॅमसंग ॲक्सिस बँकेकडून खरेदी केल्यास अतिरिक्त 10 टक्के सूट देखील उपलब्ध आहे. तर तुम्ही फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डद्वारे खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक मिळवू शकता.

Flipkart Valentine's Week Sale 2024
Finance Minister Nirmala Sitharaman: लोकसभेत श्वेतपत्रिका सादर, मोदी सरकार UPA च्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर करणार चर्चा

Realme 12 Pro 5G

तसेच, अलीकडेच लाँच केलेला Realme 12 Pro 5G देखील खूप स्वस्त किंमतीत उपलब्ध आहे. सध्या, फोनवर 15 टक्के सूट उपलब्ध आहे, त्यानंतर तुम्ही तो फक्त 26,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत, त्यानंतर तुम्ही अतिशय स्वस्त किंमतीत फोन खरेदी करु शकता.

Motorola Edge 40 Neo

फ्लिपकार्टच्या व्हॅलेंटाईन वीक सेल दरम्यान, Motorola Edge 40 Neo सध्या फक्त Rs 22,999 मध्ये उपलब्ध आहे या फोनची मूळ किंमत Rs 27,999 आहे. तसेच, डीबीएस बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्के सूट मिळेल. याशिवाय, तुम्हाला फोनवर 18,500 रुपयांची एक्स्ट्रा एक्सचेंज ऑफर देखील मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com