या खाजगी बँका बचत खात्यावर देतायेत 7 टक्के पर्यंत व्याज

फिक्स डिपॉझिटचे दर कमी झाल्यापासून लोक बचत खात्यात पैसे ठेवू लागले आहेत.
These private banks are giving up to 7% interest on Savings Account

These private banks are giving up to 7% interest on Savings Account

Dainik Gomantak

Published on
Updated on

फिक्स डिपॉझिटचे दर कमी झाल्यापासून लोक बचत खात्यात पैसे ठेवू लागले आहेत. कारण एफडी दरांच्या तुलनेत बचत खात्यावर अधिक व्याज मिळत आहे. बचत खाते तुम्हाला व्याज मिळवताना पैसे जमा करण्यास, ठेवण्यास आणि काढण्याची परवानगी देते.

बचत खात्याचे अनेक फायदे आहेत जसे की रोख, व्याजाची कमाई, पैशाची सुरक्षितता, बचत खाते आणि मुदत ठेवी दरम्यान ऑटो स्वीप सुविधेमुळे अतिरिक्त कमाई इ. खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँका बचत खाते सुविधा देतात. HDFC बँक आणि ICICI बँक सारख्या मोठ्या खाजगी बँकांच्या (Private bank) तुलनेत छोट्या खाजगी बँका नवीन किरकोळ ग्राहकांसाठी बचत खात्यांवर जास्त व्याजदर देतात.

<div class="paragraphs"><p>These private banks are giving up to 7% interest on Savings Account</p></div>
National Mathematics Day: श्रीनिवास रामानुजन...अनेक प्रमेयांचे जनक

बचत खात्यांवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या टॉप 5 खाजगी बँका

  1. AU स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यांवर 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. सरासरी मासिक शिल्लक आवश्यकता रुपये 2,000 ते 5,000 आहे.

  2. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यांवर 7 टक्के व्याजदर देत आहे.

  3. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यांवर 7 टक्के व्याजदर देत आहे. सरासरी मासिक शिल्लक आवश्यकता रुपये 2,500 ते 10,000 रुपये आहे.

  4. DCB बँक बचत खात्यांवर 6.5 टक्के पर्यंत व्याजदर देते. ही बँक खाजगी बँकांमध्ये सर्वाधिक व्याजदर देते. किमान शिल्लक रक्कम 2,500 ते 5,000 रुपये आहे.

  5. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यांवर 6.25 टक्के व्याजदर देत आहे. सरासरी मासिक शिल्लक रुपये 2,000 आहे. मोठ्या खाजगी बँकांपेक्षा लहान खाजगी बँका बचत खात्यांवर जास्त व्याजदर देतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com