'या' कंपन्या पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन करणार बंद

जगातील सर्वात मोठ्या वाहन उत्पादक कंपन्यांच्या (manufacturing companies) 6 कंपन्यांनी 2040 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन बंद करण्याचे मान्य केले आहे.
These 6 companies are going to stop manufacturing vehicles running on petrol and diesel
These 6 companies are going to stop manufacturing vehicles running on petrol and dieselDainik Gomantak
Published on
Updated on

ब्रिटन ग्लासगो येथे यूएन क्लायमेट समिटचे आयोजन करत आहे, ज्याला COP26 क्लायमेट समिट असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये जगातील सर्वात मोठ्या वाहन उत्पादक कंपन्यांच्या 6 कंपन्यांनी 2040 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन बंद करण्याचे मान्य केले आहे.

जगभरात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. या जागतिक प्रयत्नांमध्ये सहा मोठ्या कार कंपन्यांनी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. हे कार निर्माते पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन बंद करणार आहेत. या सहा कंपन्यांपैकी एक कंपनी टाटा समूहाच्या मालकीची आहे, ज्याचे नाव जग्वार लँड रोव्हर (Jaguar Land Rover) आहे.

These 6 companies are going to stop manufacturing vehicles running on petrol and diesel
आंतरराष्ट्रीय स्थरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण, पेट्रोल-डिझेलचे दर होणार?

एका वृत्तानुसार, स्वीडनची वॉल्वो, अमेरिकन ऑटोमेकर फोर्डची (Ford) मर्सिडीज बेंझ (Mercedes Benz) आणि जनरल मोटर्स (General Motors) डेमलर एजी, चीनची बीवायडी (BYD) आणि टाटा मोटर्स (Tata Motors) आणि जग्वार लँड रोव्हर (JLR) ग्लासगोमध्ये प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करणार आहेत. 21व्या शतकाच्या मध्यापर्यंत जागतिक तापमानवाढ नियंत्रित करण्याच्या मोहिमेचा महत्त्वाचा भाग बनणे हा या प्रतिज्ञाचा उद्देश आहे. यानंतर या कंपन्या 2040 पर्यंत जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन पूर्णपणे बंद करतील.

वाढत्या ग्लोबल वार्मिंगला कमी करण्यासाठी, या विशेष मोहिमेत जगातील दोन मोठ्या मोटार कंपन्या सामील आहेत, त्या म्हणजे टोयोटा मोटर कॉर्पोरेशन (Toyota Motor Corp) आणि फोक्सवॅगन एजी (Volkswagen AG). तसेच, सर्वात मोठ्या कार बाजारपेठेत समाविष्ट असलेले अमेरिका, चीन आणि जर्मनी देखील या प्रतिज्ञाचा भाग बनले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com