
भारतात आयफोनची क्रेझ कोणापासूनही लपलेली नाही. जर तुम्हीही आयफोनप्रेमी असाल तर ही बातमी नक्की वाचा. फ्लिपकार्टच्या मोन्युमेंटल सेलमध्ये तुम्हाला फक्त 40,000 रुपयांमध्ये आयफोन 16 मिळू शकेल. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अमेझॉनने फेस्टिव सेल्सची सुरुवात केली आहे. यामध्ये तुम्हाला स्मार्टफोनसह अनेक गोष्टींवर तगड्या ऑफर्स मिळत आहेत.
जर तुम्ही नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हीच ती योग्य वेळ आहे. फ्लिपकार्टवर आयफोन 16 ची किंमत ₹69,999 आहे, परंतु जर तुम्ही आयफोन 14 एक्सचेंज केला तर त्याची किंमत ₹38,4999 होईल. दुसरीकडे, जर तुम्ही OnePlus 12 एक्सचेंज केला तर iPhone 16 ची किंमत 41,399 रुपये होईल. तसेच, सॅमसंग गॅलेक्सी एस24 एक्सचेंजवर 42,349 रुपयांना खरेदी करता येईल.
HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर तुम्हाला ₹1,500 ची सूट मिळू शकते. याव्यतिरिक्त, जर तुम्ही UPI द्वारे पेमेंट केले तर तुम्हाला 1,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. अमेझॉनवर आयफोन 16 ची किंमत देखील 74,900 रुपये आहे. ही 79,900 रुपयांच्या एमआरपीपेक्षा कमी आहे. Amazon Pay ICICI क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. तथापि, फ्लिपकार्टवर एक्सचेंज ऑफरद्वारे तुम्हाला चांगली किंमत मिळत आहे.
दोन्ही प्लॅटफॉर्मवरील इतर आयफोन मॉडेल्सवरही ऑफर आणि सवलती उपलब्ध आहेत. आयफोन 15 फ्लिपकार्टवर ₹58,999 मध्ये उपलब्ध आहे. पूर्वी त्याची किंमत 69,900 रुपये एवढी होती. त्याचवेळी, आयफोन 16 प्लस 79,999 रुपयात मिळत आहे. आयफोन 16 हा सध्याचा सर्वात स्वस्त आयफोन मॉडेल आहे. हा अॅपलच्या नवीन एआय तंत्रज्ञान "अॅपल इंटेलिजेंस"ला सपोर्ट करतो.
यासोबतच एक नवीन कॅमेरा कंट्रोल बटण देखील आहे. हे कॅमेरा नियंत्रित करण्यास मदत करते. अॅपल इंटेलिजेंस फीचर आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो, आयफोन 16 प्रो मॅक्स, आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्समध्ये देखील उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल ही एक चांगली संधी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.