इलॉन मस्कला मिळवायचीये ट्विटरची मालकी, दिली 41 अरब डॉलरची ऑफर

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर विकत घेण्याची मोठी ऑफर दिली आहे.
Elon Musk
Elon MuskDainik Gomantak

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट म्हणजे ट्विटर विकत घेण्याची मोठी ऑफर दिली आहे. 43.4 अब्ज डॉलरच्या या ऑफरवर ट्विटर (Twitter) इंकनेही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यापूर्वी इलॉन मस्कने ट्विटरच्या बोर्डात सामील होण्यास नकार दिलाा होता. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

Elon Musk
इन्फोसिसने रशिया दिला मोठा झटका, युक्रेनला केली मदतीची घोषणा

पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांनी ट्विट करून लिहिले की, इलॉन मस्क ट्विटर बोर्डात सामील होण्याबाबत मी त्यांच्याशी अनेकदा चर्चा केली. आम्ही सहयोग करण्यास उत्सुक होतो, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले. इलॉन मस्क सध्या ट्विटरचे सर्वात मोठे 'शेअरहोल्डर' आहेत. त्यांचा या कंपनीत जवळपास 9 टक्के हिस्सा आहे. आता मस्कला उर्वरित स्टॉक विकत घेऊन ट्विटरची मालकी मिळवायची आहे.

ट्विटरला खाजगी कंपनी बनवण्याची गरज आहे. माझी ऑफर ही सर्वोत्कृष्ट आणि अंतिम आहे. ती स्वीकारली गेली नाही, तर मला शेअरहोल्डर म्हणून मला काही गोष्टींचा पुनर्विचार करावा लागेल, असेही मस्कने म्हटले आहे.

Elon Musk
'ट्विटर मुख्यालयाला बेघरांचे घर बनवायचे?' इलॉन मस्क यांचा प्रश्न

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटरला 41 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. म्हणजे इलॉन मस्कने प्रति शेअर 54.20 या दराने ट्विटर विकत घेण्याची ऑफर देत आहेत. यापूर्वी त्यांनी ट्विटरच्या बोर्डात सहभागी होण्याची ऑफर नाकारली होती. इलॉन मस्कच्या या ऑफरनंतर, प्री-मार्केट ट्रेडिंगमध्ये ट्विटरच्या स्टॉकमध्ये 12% वाढ होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com