केंद्र सरकारच्या निर्णयामुळे Telecom Sector मालामाल, शेअर्स उच्चांकावर

केंद्रीय मंत्रिमंडळाने (Central Government) बुधवारी तणावग्रस्त दूरसंचार क्षेत्रासाठी (Telecom Sector) मोठे मदत पॅकेज जाहीर केले.
Telecom companies shares on high today
Telecom companies shares on high todayDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्रीय मंत्रिमंडळाने (Central Government) बुधवारी तणावग्रस्त दूरसंचार क्षेत्रासाठी (Telecom Sector) मोठे मदत पॅकेज जाहीर केले. मंत्रिमंडळाने दूरसंचार क्षेत्रासाठी 9 संरचनात्मक सुधारणा आणि 5 प्रक्रियांना मंजुरी दिली आहे या सुधारणांमुळे संपूर्ण दूरसंचार क्षेत्राचे चित्र बदलेल. दिलासा जाहीर झाल्यापासून दूरसंचार कंपन्यांच्या शेअर्समध्ये (Shares) वाढ होण्याचा ट्रेंड सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशी एमटीएनएल (MTNL), व्होडाफोन(Vodafone Idea) आयडिया सारख्या दूरसंचार कंपन्यांच्या शेअर्समध्ये उडी घेतल्याने गुंतवणूकदारांना बंपर कमाई झाली आहे.(Telecom companies shares on high today)

मंत्रिमंडळाच्या बैठकीत AGR ची व्याख्या व्यावहारिक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व गैर-दूरसंचार महसूल AGR मधून काढले जातील. दूरसंचार क्षेत्रात 100% FDI ला स्वयंचलित मार्गाने परवानगी देण्यात आली आहे.

Telecom companies shares on high today
Air Indiaची मालकी पुन्हा TATA कंपनीकडे?

Vodafone Ideaचे शेअर्स 15 टक्क्यांपर्यंत वाढले

दूरसंचार मदत पॅकेजच्या घोषणेचा सर्वात जास्त फायदा वोडाफोन आयडियाला झाला आहे. वोडाफोन आयडियाचे शेअर्स गुरुवारी 15 टक्क्यांपर्यंत वाढले. ट्रेडिंग दरम्यान, स्टॉक 14.89 टक्क्यांनी वाढून बीएसई वर 10.26 रुपयांच्या किंमतीवर पोहोचला. कंपनीचे मार्केट कॅप 29,482.51 कोटी रुपयांपर्यंत वाढले.

भारती एअरटेलचा स्टॉक उच्चांकावर

रिलीफ पॅकेज मिळाल्यानंतर, देशातील दुसरी मोठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेलच्या शेअर्समध्येही वाढ नोंदवण्यात आली. आज हा शेअर बीएसईवर 743.90 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. एअरटेलचा शेअर दोन दिवसात 7.17 टक्क्यांनी वाढला आहे.

गुंतवणूकदारांना सुमारे 32 हजार कोटींचा फायदा

सरकारकडून मोठा दिलासा मिळाल्यानंतर व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलच्या गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. अवघ्या दोन दिवसांत त्यांची संपत्ती सुमारे 32,000 कोटींनी वाढली आहे. व्होडाफोन आयडियाच्या गुंतवणूकदारांना 4,511.51 कोटी रुपयांचा नफा मिळाला आणि ज्यांनी एअरटेलच्या शेअर्समध्ये पैसे ठेवले त्यांना 27,350.3 कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com