One Nation One Address भारत सरकारचा नवा उपक्रम

सध्या देशात 75 कोटींहून अधिक घरे आहेत. या सर्व घरांसाठी डिजिटल युनिक कोड (Digital Unique Code) तयार केला जाईल.
Technology

Technology

Dainik Gomantak 

Published on
Updated on

Technology: केंद्र सरकार लवकरच देशात डिजिटल अ‍ॅड्रेस कोड (DAC) आणत आहे. हा तुमच्या पत्त्याचा आधार लिंक युनिक कोड असेल. यामुळे येत्या काळात ऑनलाइन (Online) डिलिव्हरीसोबतच अनेक प्रकारच्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.

<div class="paragraphs"><p>Technology</p></div>
आता नेटफ्लिक्स अ‍ॅमेझॉन प्राइमपेक्षाही स्वस्त

अनेक वेळा कुरियर किंवा डिलिव्हरी बॉय अचूक पत्ता असूनही योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाही. काही ठिकाणी गुगल मॅप सुद्धा निकामी होतात. या समस्यांचे निवारण करण्यासाठी सरकार (Government) देशातील प्रत्येक नागरिकाला एक युनिक कोड उपलब्ध करून देणार आहे.

या कोडच्या मदतीने लोक क्यूआर कोडप्रमाणे स्कॅन करून कींवा टाइप करून घराचे (House)अचूक स्थान शोधू शकतात. या प्रकरणात, आपल्याला पत्ता जतन करण्याची देखील आवश्यकता नाही. या कोडच्या मदतीने सर्व कामे पूर्ण होतील. या कोडमध्ये तुम्ही डिजिटल (Digital) नकाशे देखील पाहू शकाल.

<div class="paragraphs"><p>Technology</p></div>
बँक खाजगीकरणाचा निर्णय अद्याप नाही: अर्थमंत्री

सध्या देशात 75 कोटींहून अधिक घरे आहेत. या सर्व घरांसाठी डिजिटल युनिक कोड (Digital Unique Code) तयार केला जाईल. डिजिटल अ‍ॅड्रेस कोड तयार करण्यासाठी देशातील प्रत्येक घराची स्वतंत्रपणे ओळख केली जाईल. यासह, प्रत्येक व्यक्तीचा पत्ता आकडे व अक्षरांच्या मेळ करून तयार केलेल्या कोडने ओळखला जाऊ शकतो.

DAC चा काय फायदा होईल ?

या कोडमुळे प्रत्येक घराची ऑनलाइन पत्ता पडताळणी करता येईल. बँकिंग (Banking), विमा, टेलिकॉमचे ई-केवायसी करणे सोपे होईल. ई-कॉमर्ससारख्या सेवेसाठी DAC खूप उपयुक्त ठरू शकते. सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी देखील DACची मदत होईल. तसेच फसवणुकीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे. मालमत्ता, कर आकारणी, आपत्ती व्यवस्थापन, जनगणना आणि लोकसंख्या नोंदी करण्यात मदत होईल. DAC वन नेशन वन अ‍ॅड्रेसचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com