'या' 5 वैशिष्ट्यांसह ॲसरने लॅपटॉपचं नवीन मॉडेल केलं लाँच

किंमत आणि वैशिष्ट्ये घ्या जाणून
intel core laptop acer
intel core laptop acer Dainik Gomantak

ॲसर या लॅपटॉप कंपनीने लॅपटॉपच नवीन व्हरजन मार्केटमध्ये आणल आहे. हे लॅपटॉप इंटेल कोर प्रोसेसर (12th Gen Intel Core) देण्यात आला आहे. कंपनीने Acer Swift 5 आणि Swift 3 या नावाने हे लॅपटॉप लॉन्च केले आहेत.

ॲसर Swift 5 ची निर्मिती व्यावसायिकांसाठी करण्यात आली आहे. तसेच ॲसर Swift 3 व्यावसायिक आणि ऑफिसच्या कामासाठी चांगला परफॉर्मस देत आहे अस मत वापरकर्ते व्यक्त करत आहेत. लॅपटॉपमध्ये 14-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे आणि ते इंटेल आयरिस Xe ग्राफिक्स देखील देण्यात आले आहेत. या लॅपटॉपमध्ये पातळ आणि हलकी सीएनसी-मशीन युनिबॉडी चेसिस देण्यात आली आहे.

intel core laptop acer
उत्कृष्ट फीचर्ससह मारुती सुझुकीने केली सर्वात स्वस्त कार लॉन्च

ॲसर Swift 5 सध्या युरोप, (Europe) मध्य पूर्व, आफ्रिकेत लॉन्च करण्यात आली आहे. त्यांची विक्री काही दिवसांत सुरू होणार आहे. ते एप्रिलपासून चीनमध्ये विकले जाईल. येथे या लॅपटॉपची (laptop) सुरुवातीची किंमत 1,799 युरो म्हणजेच जवळपास 1,51,800 रुपये ठेवण्यात आली आहे. चीनमध्ये लॅपटॉप सुमारे 1,19,000 रुपयांना विकले जातील. उत्तर अमेरिकेत, या लॅपटॉपची विक्री जूनमध्ये सुमारे 1,12,700 रुपयांना सुरू होईल.

ॲसर Swift 3 बद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत जवळपास 1,01,200 रुपये ठेवण्यात आली आहे. चीनमध्ये हा लॅपटॉप जवळपास 65,500 रुपयांना विकला जाईल आणि उत्तर अमेरिकेत त्याची किंमत जवळपास 64,000 रुपये ठेवण्यात आली आहे.

intel core laptop acer
मोठ्या डिस्प्लेसह येतोय विवो एक्स नोट, जाणून घ्या कधी होणार लॉन्च

Acer Swift 5 ची वैशिष्ट्ये

ॲसर Swift 5 लॅपटॉपमध्ये पातळ बेझल्ससह 14-इंचाचा WQXGA टचस्क्रीन डिस्प्ले आहे. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी आयनिक सिल्व्हरसह एम्बेड केलेल्या अँटीमाइक्रोबियल कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आले आहेत. लॅपटॉपला 12व्या मॉडेलचा इंटेल कोर प्रोसेसर इंटेल Iris Xe इंटिग्रेटेड ग्राफिक्ससह देण्यात आला आहे. लॅपटॉप 16GB पर्यंत ड्युअल-चॅनल LPDDR5 रॅम आणि 2TB पर्यंत PCIe Gen 4 SSD स्टोरेजसह लॉन्च करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com