दमदार कंटेंटमधून 'हे' भारतीय YouTubers कमावतात करोडो रुपये

सध्या अनेक कंटेंट क्रिएटर्स मीम्स आणि व्हिडिओ बनवून लाखोंची कमाई करत आहेत. YouTube ने अनेकांना केवळ श्रीमंतच नाही तर प्रसिद्धही केले आहे.
Technical Guruji|Bhuvan Bam| Amit Bhadana
Technical Guruji|Bhuvan Bam| Amit Bhadana Dainik Gomantak

Technical Guruji, Bhuvan Bam And Amit Bhadana India's Successful Youtubers:

आजच्या डिजिटल युगात कोणी कधी, कुठे आणि कसा व्हायरल होईल हे सांगता येत नाही. कोणीही डोळ्याच्या पापण्या झाकायच्या आत व्हायरल होतो. मग टीव्ही आणि न्यूज चॅनलचे लोक त्यांच्या मागे लागतात. प्रायोजकांपासून ते नोकरीच्या ऑफर्स मिळतात.

असे असले तरी प्रत्येक कंटेंट क्रिएटरचे नशीब इतके भारी नसते की, काही दिवसांतच त्याला नाव आणि पैसा मिळेल. त्यासाठी अनेक वर्षे कष्ट करावे लागतात.

सध्या अनेक कंटेंट क्रिएटर्स मीम्स आणि व्हिडिओ बनवून लाखोंची कमाई करत आहेत. YouTube ने अनेकांना केवळ श्रीमंतच नाही तर प्रसिद्धही केले आहे.

गौरव चौधरी (Technical Guruji)

टेक्नीकल गुरुजी म्हणजेच गौरव चौधरी यूट्यूबवर तंत्रज्ञानाविषयी कंटेंट अपलोड करतात. ते भारतातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या YouTubers पैकी एक आहे. त्याचे यूट्यूबवर 2 कोटींपेक्षा जास्त सब्सक्रायबर्स आहेत.

गौरव 11वीतच कोडिंग शिकला होता. 2012 पासून यूट्यूब चॅनल सुरू करण्याची इच्छा होती पण त्याने 2015 मध्ये टेक्निकल गुरुजी चॅनल लाँच केले.

तो केवळ टेक व्हिडिओच बनवत नाही तर दुबई पोलिसात सेक्युरिटी सिस्टम अभियंताही आहे. त्यांनी BITS पिलानीच्या दुबई कॅम्पसमधून मायक्रोइलेक्ट्रॉनिकमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे.

2020 मध्ये, फोर्ब्सने गौरव चौधरीचा 30 अंडर 30 च्या यादीत समावेश केला. इतर कंटेंट क्रिएटर्स इंग्रजीत व्हिडिओ बनवायचे पण गौरवने हिंदीत व्हिडिओ बनवण्याचा धोका पत्करला. मिळालेल्या माहितीनुसार, गौरव चौधरीची एकूण संपत्ती सुमारे 374 कोटी रुपये आहे.

Technical Guruji|Bhuvan Bam| Amit Bhadana
बाप टोमणे मारायचा, पण ल्योक जिद्दी होता; गोष्ट 2 हजार कोटींच्या बिझनेसची

भुवन बाम

बीबी की वाइन्स उर्फ ​​भुवन बाम हे जवळपास प्रत्येक भारतीयाला माहीत असलेले नाव आहे. कॉमेडी असो, अभिनय असो, गाणे असो किंवा कविता लिहिणे असो, प्रत्येक क्षेत्रात त्याने स्वत:ला पारंगत केले आहे.

2015 मध्ये भुवन बामने त्यांचे YouTube चॅनल सुरू केले. त्याचे यूट्यूबवर अडीच कोटींहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. भुवनला या यशापर्यंत पोहचायला खूप संघर्ष करावा लागला. त्याने गरज पडेल तेव्हा रेस्टॉरंटमध्ये गाणी गायली पण आपली आवड सोडली नाही.

भुवन काश्मीरमध्ये आलेल्या पुरानंतरचा विध्वंस पाहत होता. यूट्यूब व्हिडिओवर बोलताना तो म्हणाले, "मी काश्मीरमधील पुरानंतरच्या परिस्थितीचे रिपोर्ट्स पाहत होतो. एका स्थानिक रहिवाशाने त्याचे घर आणि एक मुलगा गमावला होता. पत्रकाराने त्याला विचारले की त्याला कसे वाटते. या असंवेदनशीलतेने मी प्रभावित झालो आहे. मग मी त्यावर पहिल्यांदा 10-15 सेकंदांची क्लिप बनवली. 2016 मध्ये, बामचा 'व्हॅलेंटाइन वीक हुटियापा' मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यूट्यूबच्या माध्यामातून त्याने करोडो रुपये कमावले आहेत.

Technical Guruji|Bhuvan Bam| Amit Bhadana
Successful Start-Ups: घरोघरी भाजी विकणाऱ्या तरुणाने उभारले करोडोंचे स्टार्टअप, आज कमावतोय महिन्याला लाखो रुपये

अमित भडाणा

अमित भडाणाने कॉलेज दिवसांपासूनच व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली होती. त्याने सर्वप्रथम फेसबुकवर एक डब केलेला व्हिडिओ शेअर केला जो प्रेक्षकांना खूप आवडला.

फेसबुकवर लोकांचा प्रतिसाद पाहून भडाणा यांनी एक यूट्यूब चॅनल तयार करण्याचा निर्णय घेतला. भडाणाचे यूट्यूब चॅनल 2012 मध्येच सुरू झाले होते, परंतु त्याला यश मिळण्यासाठी थोडा वेळ लागला.

2017 मध्ये त्याने 'एक्झाम्स बी लाइक' हा व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर त्याचा 'बोर्ड्स प्रिपरेशन बी लाइक' हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. कॉमेडी व्हिडिओ बनवणाऱ्या भदाणाचे जवळपास अडीच कोटी सबस्क्राइबर्स आहेत. त्याची एकूण संपत्ती सुमारे 83 कोटी रुपये आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com