रिलायन्सला टक्कर देण्यासाठी टाटाची नवी योजना, या 5 ब्रँड्ससोबत चर्चा सुरु

टाटा समूहाची (Tata Group) उप कंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लि. बाजारपेठेत आपली पोहोच वाढवण्यासाठी एका मोठ्या योजनेवर काम करत आहे.
Ratan Tata
Ratan TataDainik Gomantak
Published on
Updated on

टाटा समूहाची उप कंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लि. बाजारपेठेत आपली पोहोच वाढवण्यासाठी एका मोठ्या योजनेवर काम करत आहे. मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) रिलायन्सला टक्कर देण्यासाठी टाटा कंझ्युमर कंपनी फूड आणि बेवरेज क्षेत्रातील अनेक कंपन्या ताब्यात घेण्याची योजना आखत आहे. या क्षेत्रातील किमान पाच ब्रँड्सबाबत चर्चा सुरु आहे. ब्लूमबर्गने आपल्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.

दरम्यान, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे सीईओ सुनील डिसूझा (Sunil D'Souza) यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, कंपनी अशा अनेक संभाव्य कंपन्यांशी चर्चा करत आहे, जिथे त्यांच्या मूल्यांकनात वाढ होण्याची शक्यता आहे.

Ratan Tata
रिलायन्सला 'जिओ' वाला झटका, 40 दशलक्ष सब्सक्राइबर्संनी सोडली साथ

ते पुढे म्हणाले की 'कंपनी अशा संभाव्य कंपन्यांशी गांभीर्याने चर्चा करत आहे'. मात्र, कोणत्या कंपन्या आपले टार्गेट आहेत याबाबत त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

याशिवाय,153 वर्ष जुन्या टाटा समूहाने 2020 मध्ये ग्राहक बाजारपेठेत (Markets) एन्ट्री करत टाटा कंझ्युमर कंपनी सुरु केली. तेव्हापासून कंपनीने NourishCo Beverages Ltd चे अधिग्रहण केले आहे. आणि Soulfull सारख्या कंपन्यांचे अधिग्रहण करुन पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com