Reliance Jio
Reliance JioDainik Gomantak

रिलायन्सला 'जिओ' वाला झटका, 40 दशलक्ष सब्सक्राइबर्संनी सोडली साथ

मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) रिलायन्स जिओमुळे दर महिन्याला लाखो ग्राहकांचा भ्रमनिरास होत आहे.
Published on

मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) रिलायन्स जिओमुळे दर महिन्याला लाखो ग्राहकांचा भ्रमनिरास होत आहे. जिओने गेल्या 6 महिन्यांत 40 दशलक्ष ग्राहक गमावले आहेत. ही संख्या व्होडाफोन-आयडिया सोडणाऱ्या ग्राहकांपेक्षा पाचपट अधिक आहे. दुसरीकडे एअरटेलच्या ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत आहे. एअरटेलने गेल्या 6 महिन्यांत 4 दशलक्ष नवीन ग्राहक जोडले आहेत.

Reliance Jio
टाटा समूहाचे एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी खास 'गिफ्ट'

मागील 6 महिन्यांतील सब्सक्राइबर्संची मानसिकता

जर तुम्ही गेल्या 6 महिन्यांची सरासरी पाहिली तर, रिलायन्स (Reliance) जिओने दर महिन्याला सुमारे 68 लाख सब्सक्राइबर्स गमावले आहेत. व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea) दरमहा सुमारे 12 लाख सदस्य गमावले आहेत. दुसरीकडे मात्र, या कालावधीत एअरटेलने दर महिन्याला सुमारे 6 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत.

सदस्य गमावणे ही जिओसाठी चांगली बातमी

सदस्य गमावणे हे या कथेचे अर्धे सत्य आहे. रिलायन्स जिओचे सदस्य कमी होत असले तरी त्यांचे सक्रिय सदस्य सातत्याने वाढत आहेत. म्हणजेच जिओचे असेच ग्राहक कमी होत आहेत, ज्यातून कंपनीला कोणताही महसूल मिळत नाही. अर्थातच ज्यांच्याकडे जिओ सिम आहे, परंतु ते नियमित रिचार्ज करत नाही. जिओने जुलै 2021 मध्ये सक्रिय ग्राहकांच्या मार्केट शेअरमध्ये एअरटेलला मागे टाकले होते. तेव्हापासून जिओच्या अॅक्टिव्ह सब्सक्राइबर्सचे मार्केट शेअर सातत्याने वाढत आहे.

Reliance Jio
पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; लवकरच खात्यात पैसे जमा होणार

जिओ आणि एअरटेलचे सक्रिय सदस्य वाढवण्याचा अर्थ

नोव्हेंबर 2021 मध्ये भारतातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी टॅरिफ दर 20-25% ने वाढवले होते. सक्रिय सदस्यांची वाढ हे वापरकर्त्यांनी वाढीव दर स्वीकारल्याचे संकेत असल्याचे तज्ञांचे मत आहे. यामध्ये रिलायन्स जिओ सर्वाधिक सक्रिय सदस्य वाढवून मार्केटमध्ये आघाडीवर आहे. त्यानंतर एअरटेलचा (Airtel) क्रमांक लागतो. व्होडाफोनचे सक्रिय सदस्य सातत्याने कमी होत आहेत. या सर्व बाबींमुळे दर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे टेलिकॉम वापरकर्त्यांसाठी हे चांगले संकेत नाहीत.

मुकेश अंबानींचा नवीन गेम-प्लॅन

2016 मध्ये जेव्हा Jio लाँच झाले तेव्हा भारताच्या टेलिकॉम मार्केटमध्ये अफाट स्पर्धा होती. 8 कंपन्या असूनही, वापरकर्त्यांना 1 मिनिट कॉलसाठी सरासरी 58 पैसे मोजावे लागले. जिओने सर्वप्रथम बाजारात पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या दिवसांमध्ये, जिओने अत्यंत कमी किमतीत अमर्यादित डेटा आणि हाय क्वालिटी कॉलिंग सेवा प्रदान केली. इतर दूरसंचार ऑपरेटर्संना देखील त्यांचे व्यवसाय मॉडेल बदलण्यास जिओने भाग पाडले. हळूहळू मार्केटमधील स्पर्धा कमी होत गेली आणि जिओचा दबदबा वाढला. भारताच्या टेलिकॉम मार्केटमध्ये आता फक्त तीनचं कंपन्या उरल्या आहेत.

दुसरीकडे, तज्ज्ञांचे म्हणण्यानुसार, आता जिओ आपल्या रणनीतीत काही बदल करत आहे. आता जिओचे लक्ष त्यांच्या ARPU ( User Average Revenue) वाढवण्यावर आहे. यासाठी ते त्यांच्या सक्रिय सब्सक्राइबर्सच्या संख्येवर लक्ष केंद्रित करत आहेत. गेल्या वर्षी एका मुलाखतीत मुकेश अंबानी म्हणाले होते की, ''जिओ आता ग्रामीण आणि अतिदुर्गम भागांवर लक्ष केंद्रित करत आहे. 2G यूजर्ससाठी Jio Phone Next लाँच करणे हे त्या दिशेने एक पाऊल आहे. Jio ने भारतात 5G साठी पूर्ण तयारी केली आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com