Success Story Of Pune Girl Neha Narkhede Who Built Confluent Company Worth 42000 Crores In USA:
अनेक भारतीयांनी परदेशात यशस्वीपणे आपले उद्योग-व्यवसाय उभारले आहेत. नेहा नरखेडे त्यापैकीच एक. तिची अमेरिकेतील सर्वात यशस्वी महिला उद्योजक म्हणून गणना केली जाते.
पुण्यात जन्मलेली नेहा तंत्रज्ञान आणि सेवांच्या जगात प्रसिद्धी मिळवणाऱ्या महिलांमध्ये आहे. फोर्ब्सने अमेरिकेतील स्वयंनिर्मित श्रीमंत महिलांमध्ये तिला दुसरे स्थान दिले आहे
व्यवसायात चढ-उतार येत असतात. काही पराभवावर मात करून विजय संपादन करतात, तर काही निराश होऊन माघार घेतात. पुण्याच्या नेहा नारखेडेने पराभवाचा परभव करत विजय मिळवला आहे.
का वर्षात 8600 कोटींचा तोटा झाल्यानंतर ती पुन्हा उभा राहिली आहे. भारतीय वंशाच्या नेहा नारखेडेने अमेरिकेत 75 हजार कोटी रुपयांची कंपनी स्थापन करून एक वेगळी उंची गाठली आहे.
आज आपण ज्या व्यक्तीबद्दल इथे बोलणार आहोत ती एक सुप्रसिद्ध अमेरिकन उद्योजक आणि कॉन्फ्लुएंटची सह-संस्थापक आहे आणि ती माजी CTO देखील आहे.
आम्ही बोलत आहोत, महाराष्ट्रातील पुण्यात जन्मलेली नेहा नरखेडेबद्दल. नेहा आज अमेरिकेतील सर्वात यशस्वी महिलांमध्ये गणली जाते. जगातील आघाडीच्या बिझनेस मॅगझिन फोर्ब्सने नेहाला सेल्फ मेड अमेरिकन महिलांच्या यादीत समाविष्ट केले आहे.
नेहाला हे स्थान इतक्या सहजासहजी मिळाले नाही. प्रदीर्घ संघर्ष आणि अनेक चढउतारानंतर त्यांनी हे स्थान मिळवले आहे.
याआधी 2021 मध्ये नेहा ही 8वी श्रीमंत भारतीय महिला होती. त्या वर्षी तिच्या कंपनीचा IPO आला, त्यानंतर तिची नेट वर्थ प्रचंड वाढली.
1985 मध्ये पुण्यात जन्मलेल्या नेहाने आज अमेरिकेत आपले उद्योग विश्व तयार केले आहे.
नेहाने 2006 मध्ये भारत सोडला. यानंतर, 2007 मध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर, तिने ओरॅकल आणि नंतर लिंक्डइन येथे आपले करिअर सुरू केले, जिथे तिने सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम केले.
यानंतरच तिने कॉन्फ्लुएंट कंपनी सुरू केली. या व्यतिरिक्त, नेहा अपाचे काफ्का या ओपन-सोर्स मेसेजिंग सिस्टमचीही सह-संस्थापक देखी आहे. ती आज अनेक तंत्रज्ञान कंपन्यांसाठी गुंतवणूकदार आणि सल्लागार म्हणून काम करते.
नेहाचा जन्म भारतात झाला. पुण्यात वाढलेल्या नेहाने अमेरिकेतील जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर लिंक्डइन आणि ओरॅकलमध्ये काम केले, त्यानंतर त्यांनी अमेरिकेत स्वतःची कंपनी कॉन्फ्लुएंट सुरू केली.
2021 मध्ये त्यांच्या कंपनीचा IPO आला आणि तिची एकूण संपत्ती 13380 कोटी रुपये झाली. तिला भारतातील 8 व्या सर्वात श्रीमंत महिलेचा किताब मिळाला, परंतु 2022 मध्ये तिच्या संपत्तीत मोठी घट झाली. 2022 च्या हुरुन रिच लिस्टनुसार त्यांची संपत्ती फक्त 4700 कोटींवर आली आहे. एका वर्षात त्यांचे सुमारे 8600 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.
फोर्ब्सच्या मते, नेहाची 2019 मध्ये एकूण संपत्ती 360 कोटी डॉलर्स होती. 2020 मध्ये 600 कोटी आणि 2021 मध्ये ती 925 कोटी डॉलर झाली. 2022 मध्ये तिची संपत्ती 490 कोटी डॉलरवर पोहचली होती. सध्या त्यांची एकूण संपत्ती 520 कोटी डॉलर्स म्हणजे सुमारे 4268 कोटी रुपये आहे.
नेहासह तिच्या दोन सह संस्थापकांनी 2014 मध्ये LinkedIn चा राजीनामा दिला आणि Confluent कंपनी सुरू केली. नेहाच्या या यशामागे तिच्या वडिलांचा हात आहे आणि ती स्वतःच हे सांगते.
नेहाच्या म्हणण्यानुसार, ती लहान असताना तिचे वडील तिला इंदिरा गांधी, किरण बेदी, इंद्रा नूयी यांसारख्या व्यक्तिमत्त्वांची पुस्तके तिला प्रेरित करण्यासाठी वाचायला देत असत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.