Income Tax Return Online Filing: आयटीआर ऑनलाइन भरण्याची संपूर्ण प्रक्रिया, जाणून घ्या सोप्या स्टेप्स

शेवटच्या क्षणी चुका टाळण्यासाठी आयकर रिटर्न लवकर भरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यासाठी फॉर्म 16, फॉर्म 16A आणि कर बचत गुंतवणुकीचा पुरावा यासारखी महत्त्वाची कागदपत्रे बरोबर असावी लागतात.
Income tax return Online filing
Income tax return Online filingDainik Gomantak
Published on
Updated on

Income Tax Return Online Filing: यंदाच्या अर्थिक वर्षात आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. आतापर्यंत, तुमच्यापैकी बहुतेकांना फॉर्म-16 मिळालेला असेल.

अर्थिक सल्लागारांनी करदात्यांना शेवटच्या क्षणी आयटीआर फाइल करण्यासाठी गर्दी करण्यापेक्षा ऑनलाइन पद्धतीने सोप्या स्टेप्स फॉलो करत आयटीआर फाइल करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे मोक्याच्या क्षणी होणाऱ्या चुकाही टाळल्या जातील.

Income tax return Online filing
IIFL Securities ला सेबीचा दणका! IIFL चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे

ITR ऑनलाइन कसा भरायचा?

ई-फायलिंग पोर्टल आणि अ‍ॅप्स किंवा चार्टर्ड अकाउंटंट्स यांसारख्या मध्यस्थांमार्फत तुमचा ITR दाखल करण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे.

तुम्ही ते स्वतः भरत असाल, तर तुमच्यापैकी बहुतेकांना ते आयकर विभागाच्या वेबसाइटवर ऑनलाइन फाइल करावे लागेल.

आवश्यक कागदपत्रे

जरी ई-फायलिंग पोर्टलवर आयटीआर फॉर्म आधीच भरलेले असले तरी, भांडवली नफ्याचा आयटीआर मॅन्युअली भरणे आवश्यक आहे. यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत जी तुम्ही आयटीआर भरताना हातात ठेवली पाहिजेत.

-फॉर्म 16

-फॉर्म 16A

-फॉर्म 26AS

-कॅपिटल गेन स्टेटमेंट

-कर बचत गुंतवणुकीचा पुरावा

Income tax return Online filing
बॅंकांमध्ये खेटे घालणे बंद करा; आता 2000 ची नोट बदलून देण्यासाठी Amazon घरी येणार!

आयटीआर दाखल करण्यासाठी स्टेप्स

-आयकर ई-फायलिंग पोर्टलवर जा.

- तुमचा यूजर आयडी (पॅन), पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करा.

-'ई-फाइल' मेनूवर क्लिक करा आणि 'इन्कम टॅक्स रिटर्न' लिंकवर क्लिक करा.

-तुमचे उत्पन्न आणि इतर घटकांवर आधारित योग्य आयकर रिटर्न (ITR) फॉर्म निवडा. तुमच्याकडे फॉर्म 16 असल्यास, तुम्ही ITR-1 किंवा ITR-2 वापरू शकता.

-त्यानंतर, ज्या वर्षासाठी तुम्हाला ITR भरायचा आहे ते मूल्यांकन वर्ष (AY) निवडा.

- फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेला सर्व डेटा पुन्हा चेक करा आणि सबमिट करा.

-तुमचे रिटर्न सबमिट केल्यानंतर, आधार ओटीपी इत्यादी सारख्या उपलब्ध पर्यायांपैकी कोणतेही वापरून त्याची ई-पडताळणी करा.

-ई-व्हेरिफाय रिटर्न अपलोड करा

शेवटची स्टेप म्हणजे तुमचे सर्व तपशील पुन्हा तपासणे आणि फॉर्म अपलोड करणे.

ITR दाखल करण्याची अंतिम मुदत

आर्थिक वर्ष 2022-23 (AY 2023-24) साठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com