Sukanya Samriddhi Yojana मध्ये 5 मोठे बदल, गुंतवणूकदारांना माहिती नसेल तर...

Sukanya Samriddhi Yojana Changes: मुलीचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने सुरु केलेली सुकन्या समृद्धी योजना (SSY) हा एक चांगला उपक्रम आहे.
Girl
GirlDainik Gomantak
Published on
Updated on

Sukanya Samriddhi Yojana Changes: मुलींचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने सुरु केलेली सुकन्या समृद्धी योजना (SSY) हा एक चांगला उपक्रम आहे. तुम्हालाही या सरकारी योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला त्यातील बदलांची माहिती घ्यावी लागेल.

दरम्यान, सरकारच्या लहान बचत योजनांपैकी एक असलेल्या 'सुकन्या समृद्धी योजना' (SSY) मध्ये गुंतवणुकीवर (Investment) तुम्हाला 80C अंतर्गत सूट देखील मिळते. याशिवाय तुम्हाला यावर दरवर्षी 7.6 टक्के व्याज मिळते. चला जाणून घेऊया SSY मधील 5 मोठे बदल...

Girl
Sukanya Samriddhi Yojana: या योजनेचा लाभ घेऊन करा तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित

नवीन नियमांनुसार, सुकन्या समृद्धी खात्यात चुकीचे व्याज टाकल्यास ते परत करण्याची तरतूद काढून टाकण्यात आली आहे. यापूर्वी चुकीचे व्याज काढण्याची तरतूद होती. याशिवाय, प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्याचे वार्षिक व्याज जमा केले जाईल.

पूर्वी, तुमची मुलगी 10 वर्षांची असताना तिचे 'सुकन्या समृद्धी योजना' खाते चालवू शकत होती. नवीन नियमांनुसार, आता 18 वर्षापूर्वीच्या मुलींना खाते चालवण्याची परवानगी नाही. म्हणजेच, मुलीच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत फक्त पालक खाते चालवतील. तुम्ही खात्यात वार्षिक किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा करु शकता. तुम्ही किमान रक्कम जमा न केल्यास तुमचे खाते डीफॉल्ट होऊ शकते. तुम्ही महिन्यात कितीही वेळा पैसे जमा करु शकता.

Girl
Janani Suraksha Yojana: गरोदर महिलांना सरकारकडून मिळणार आर्थिक मदत, असा घ्या लाभ

नवीन नियमानुसार, डिफॉल्ट खात्यावर देखील व्याज जमा होत राहते. तुमचे खाते अ‍ॅक्टीव्ह नसल्यास, मुदतपूर्तीपर्यंत, खात्यात जमा केलेली रक्कम लागू दराने व्याज मिळविण्यासाठी वापरली जाते. पूर्वी हा नियम नव्हता.

यापूर्वी, गुंतवणूकदाराला दोन मुलींचे (Girl) खाते उघडल्यानंतरच 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळत असे. मात्र तिसर्‍या मुलीला त्याचा काही उपयोग होत नव्हता. परंतु एका मुलीच्या पश्चात दोन जुळ्या मुली असतील तर त्या दोघींसाठीही खाते उघडण्याची तरतूद आहे.

Girl
PM Kisan Yojana: मोदी सरकार शेतकऱ्यांना देत आहे 15 लाख रुपये, त्वरित अर्ज करा

तसेच, 'सुकन्या समृद्धी योजने'चे खाते मुलीच्या मृत्यूनंतर किंवा मुलीचे निवासस्थान बदलल्यानंतर बंद केले जाऊ शकते. मात्र आता यामध्ये खातेदाराच्या जीवघेण्या आजाराचाही समावेश करण्यात आला आहे. पालकाचा मृत्यू झाल्यास खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com