FB Insta Blue Tick: फेसबूक, इन्स्टाग्रामवर ब्लू टिकसाठी मोजावे लागणार 'इतके' पैसे

एकदा पडताळणीनंतर नावात बदल करण्यासाठी पुन्हा प्रक्रियेतून जावे लागणार
FB Insta Blue Tick
FB Insta Blue TickDainik Gomantak

FB Insta Blue Tick: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरनंतर मेटा कंपनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही पेड ब्लू टिक सेवा सुरू करण्यात आली आहे. याद्वारे ठराविक शुल्क भरून कोणताही इंस्टाग्राम आणि फेसबुक वापरकर्ता त्याच्या प्रोफाईलवर ब्लू टिक लावू शकतो.

FB Insta Blue Tick
D-SIBs in India: भारतातील 'या' 3 बँका सर्वाधिक सुरक्षित; पैसे कधीच नाहीत बुडणार...

वेबवर साइन अप करणार्‍या वापरकर्त्यांना फक्त Facebook वर ब्लू टिक्स मिळतील, तर मोबाईल अॅप वापरकर्त्यांना Facebook आणि Instagram या दोन्हींसाठी ब्लू टिक्स मिळतील.

ब्लू टिक हा एक पडताळणी बॅज आहे, ज्याद्वारे एखाद्याचे फेसबूक किंवा इन्स्टाग्राम अकाऊंट हे अधिकृत आहे ते कळते.

मोबाईलवर दरमहा 1237 रुपये मोजावे लागतील,

सध्या कंपनीने ही सेवा अमेरिकेत सुरू केली आहे, लवकरच ही सेवा इतर देशांमध्येही सुरू होणार आहे. वापरकर्त्यांनी वेबवर साइन अप केल्यास या सेवेची किंमत प्रति महिना $11.99 (रु. 989) आहे.

युजर्सनी मोबाईल अॅपद्वारे साइन अप केल्यास $14.99 प्रति महिना म्हणजेच 1237 रूपये शुल्क आहे.

FB Insta Blue Tick
New Income Tax Rules: प्राप्तीकराचे 'हे' नियम 01 एप्रिलपासून बदलणार

ब्लू टिकसाठी पैसे मोजण्यास सर्वप्रथम ट्विटरने सुरूवात केली. इंस्टाग्रामने यापूर्वी मीडिया संस्थांमध्ये काम करणाऱ्या लोकांना, प्रभावशाली व्यक्तींना, सेलिब्रिटींना आणि राजकारण्यांना त्यांच्या नावापुढे ब्लू टिक लावण्याची परवानगी दिली होती. आता कोणताही वापरकर्ता ब्लू टिक खरेदी करू शकतो.

ब्लू टिक कोणाला मिळेल?

Instagram वर ब्लू टिक खरेदी करण्यासाठी, वापरकर्त्याचे वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे, त्यांचा फोटो आयडी सबमिट करणे आणि सत्यापन प्रक्रियेतून जाणे आवश्यक आहे.

मेटा वर एकदा वापरकर्त्याची पडताळणी झाल्यानंतर, त्याला प्रोफाईल नाव किंवा डिस्प्ले नाव किंवा प्रोफाइलवरील इतर कोणतीही माहिती बदलणे सोपे नसेल. त्यासाठी युजरला पुन्हा पडताळणी प्रक्रियेतून जावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com