New Income Tax Rules: प्राप्तीकराचे 'हे' नियम 01 एप्रिलपासून बदलणार

पगारदारांना नवीन कर प्रणालीचा लाभ
New Income Tax Rules
New Income Tax RulesDainik Gomantak
Published on
Updated on

New Income Tax Rules: चालू आर्थिक वर्ष (FY23) मार्चअखेर संपेल आणि नव्या आर्थिक वर्षाची सुरवात 1 एप्रिलपासून होईल. 1 तारखेपासून अनेक नियमही बदलणआर आहेत. प्राप्तीकरबाबतचे काही नियम बदलणार असून हे बदल फेब्रुवारीमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात (केंद्रीय अर्थसंकल्प 2023) प्रस्तावित केले होते.

New Income Tax Rules
D-SIBs in India: भारतातील 'या' 3 बँका सर्वाधिक सुरक्षित; पैसे कधीच नाहीत बुडणार...

पगारदारांच्या टीडीएसमध्ये कपात

पुढील महिन्यापासून पगारदारांना नवीन कर प्रणालीचा लाभ मिळणार आहे. अशा लोकांसाठी आता TDS कपात कमी होऊ शकते. ज्यांचे करपात्र उत्पन्न 7 लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यांनी नवीन कर प्रणालीची निवड केली आहे, त्यांना कोणताही TDS आकारला जाणार नाही. यासाठी आयकर कायद्याच्या कलम 87 ए अंतर्गत अतिरिक्त सूट दिली आहे.

सूचीबद्ध डिबेंचर्सवर टीडीएस

आयकर कायद्याचे कलम 193 काही सिक्युरिटीजच्या संदर्भात भरलेल्या व्याजावर TDS सूट देते. जर सिक्युरिटी डीमटेरियल फॉर्ममध्ये असेल आणि एखाद्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध असेल तर अशा प्रकरणांमध्ये भरलेल्या व्याजावर टीडीएस कापला जाणार नाही. याशिवाय, इतर सर्व पेमेंटवर 10 टक्के टीडीएस कापला जाईल.

ऑनलाइन गेमवर कर

ऑनलाइन गेम खेळून पैसे जिंकत असाल तर आता तुम्हाला त्यावर मोठा कर भरावा लागेल. आयकर कायद्याच्या नवीन कलम 115 BBJ अंतर्गत, अशा जिंकलेल्यांवर 30 % कर आकारला जाईल. हा कर TDS म्हणून कापला जाईल.

New Income Tax Rules
PM Kisan Installment: 19 दिवस उलटूनही पीएम किसानचा 13वा हप्ता आला नाही? अन्नदात्याकडे 'हा' आहे पर्याय

आयकर कायद्याच्या कलम 54 आणि 54 एफ अंतर्गत मिळणारे फायदे नवीन आर्थिक वर्षापासून कमी केले जातील. 01 एप्रिलपासून या कलमांतर्गत फक्त 10 कोटी रुपयांपर्यंतच्या भांडवली नफ्यावर सूट दिली जाईल. यापेक्षा जास्त भांडवली नफ्यावर इंडेक्सेशनच्या फायद्यासह 20 टक्के दराने कर आकारला जाईल.

भांडवली नफ्यावर जास्त कर

1 एप्रिल 2023 पासून मालमत्तेच्या विक्रीतून झालेल्या नफ्यावर जास्त भांडवली नफा कर भरावा लागेल. आता कलम 24 अंतर्गत दावा केलेले व्याज खरेदी किंवा दुरुस्तीच्या खर्चामध्ये समाविष्ट केले जाणार नाही.

सोन्याबाबत हा बदल

एप्रिल महिन्यापासून तुम्ही भौतिक सोन्याचे EGR किंवा इलेक्ट्रॉनिक सोन्याच्या पावतीचे भौतिक सोन्यात रूपांतर केल्यास, तुम्हाला त्यावर कोणताही भांडवली नफा कर भरावा लागणार नाही. तथापि, याचा लाभ घेण्यासाठी, सेबीच्या नोंदणीकृत व्हॉल्ट व्यवस्थापकाकडून रूपांतरण करून घ्यावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com