Snake In Air India: एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान दुबई विमानतळावर उतरताच त्यातून साप बाहेर आला. विमानात साप दिसल्यानंतर तिथे उपस्थित असलेले लोक घाबरले. मात्र, हा साप विमानाच्या त्या भागात नव्हता, जिथे लोक बसले होते, तर कार्गो होल्डमधून तो बाहेर आला. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) अधिकाऱ्याने सांगितले की, पथकाने या घटनेचा तपास सुरु केला आहे.
दरम्यान, एअर इंडिया एक्स्प्रेसचे बी-737-800 विमान केरळमधील (Kerala) कालिकतहून दुबईला पोहोचले होते. विमानात साप असल्याची बातमी समजल्यानंतर त्यामध्ये उपस्थित असलेल्या प्रवाशांना सुखरुप खाली उतरवण्यात आले. संपूर्ण घटनेचे वर्णन करताना डीजीसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, विमान दुबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याच्या कार्गो होल्डमध्ये एक साप आढळून आला. त्यानंतर विमानतळाच्या अग्निशमन विभागाला याची माहिती देण्यात आली.
'किती लोक होते माहीत नाही'
ग्राऊंड हँडलिंगमध्ये झालेल्या चुकीचे हे प्रकरण असून, या घटनेची चौकशी करुन कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. एअर इंडिया (Air India) एक्स्प्रेसकडून सध्या कोणत्याही प्रकारचे वक्तव्य आलेले नाही. तसेच त्यावेळी विमानात किती प्रवासी होते, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
तसेच, या संपूर्ण घटनेकडे निष्काळजीपणा म्हणून पाहिले जात आहे. विमानाच्या कार्गो होल्डमध्ये साप कसा पोहोचला आणि एकाही कर्मचाऱ्यांना तो कसा दिसला नाही, हा प्रश्न आहे. याआधीही विमानातून साप बाहेर येण्याच्या घटना समोर येत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला एअर एशियाच्या विमानात साप आढळल्याने खळबळ उडाली होती.
शिवाय, 10 फेब्रुवारी 2022 रोजी क्वालालंपूरला जाणाऱ्या एअर एशियाच्या फ्लाइटमध्ये साप आढळला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.