'या' बातमीनंतर अदानी समूहाच्या शेअर्स ने घेतली गगनभरारी

अदानी पॉवरच्या स्टॉकमध्ये (Adani power share price) आजकाल प्रचंड वाढ होत आहे.
Gautam Adani
Gautam AdaniDainik Gomantak
Published on
Updated on

Adani Power Stock: अदानी पॉवरच्या स्टॉकमध्ये (Adani power share price) आजकाल प्रचंड वाढ होत आहे. शुक्रवारी ट्रेडिंगच्या शेवटच्या दिवशी कंपनीचे शेअर्स जवळपास 9 टक्क्यांच्या उसळीसह बंद झाले. 23 मार्चपासून कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ होत आहे. स्टॉकने फक्त चार ट्रेडिंग सत्रांमध्ये 14 टक्क्यांनी उसळी घेतली. किंबहुना, सहा उपकंपन्या अदानी पॉवरमध्ये (Adani Power) विलीन होणार असल्याच्या वृत्तानंतर शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. (Shares rose after news that six subsidiaries would merge with Adani Power)

दरम्यान, 22 मार्च रोजी एक बातमी आली ज्यात अदानी पॉवरने सांगितले की, 'आमच्या संचालक मंडळाने संपूर्ण मालकीच्या सहा उपकंपन्यांचे विलीनीकरण करण्याची योजना मंजूर केली आहे.' या बातमीनंतर अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त वाढ झाली. दुसऱ्याच दिवशी कंपनीच्या 8.69% शेअर्सने 134.35 रुपयांपर्यंत झेप घेतली होती. जो 22 मार्च रोजी 123.60 रुपयांवर बंद झाला.

Gautam Adani
अनिल अंबानींचा पाय आणखी खोलात; रिलायन्स पॉवर, इन्फ्राच्या संचालकपदावरुन पायउतार

कंपनीने बीएसईला माहिती दिली

"अदानी पॉवर लिमिटेडच्या संचालक मंडळाने, 22 मार्च, 2022 रोजी झालेल्या बैठकीत, आवश्यक मंजूरी/संमतींच्या अधीन राहून, पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांचे एकत्रीकरण करण्याच्या योजनेला मंजुरी दिली," BSE फाइलिंगमध्ये यासंबंधीची माहिती दिली आहे.

या कंपन्या असतील

फाइलिंगनुसार, अदानी पॉवरमध्ये विलीन होणार्‍या उपकंपन्या अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड, अदानी पॉवर राजस्थान लिमिटेड, अदानी पॉवर लिमिटेड, उडुपी पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, रायपूर एनर्जी लिमिटेड आणि रायगड एनर्जी जनरेशन लिमिटेड आहेत. या कंपन्या अदानी पॉवरच्या पूर्ण मालकीच्या उपकंपन्या आहेत.

Gautam Adani
परमबीर सिंहांचा पाय आणखीनच खोलात, 'या' अहवालाप्रकरणी दिले 5 लाख रुपये

अदानी पॉवरला कंपन्यांची मालमत्ता मिळेल

योजनेची देय तारीख 1 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या सहा कंपन्यांची संपूर्ण मालमत्ता आणि दायित्वे अदानी पॉवरकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. या सह उप कंपन्यांचे एकत्रीकरण करुन एक मजबूत कंपनी तयार करणे हा आमचा उद्देश असल्याचे मंडळाने म्हटले आहे. त्याचबरोबर कंपनीच्या फाइलिंगमध्ये असे म्हटले आहे की, 'दीर्घकालीन अधिक चांगला आर्थिक परतावा मिळविण्यासाठी अनेक घटकांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. मात्र या विलीनीकरण योजनेअंतर्गत कंपनीच्या इक्विटी शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये कोणताही बदल होणार नाही. कारण या योजनेच्या संदर्भात फर्मद्वारे कोणतेही शेअर्स जारी केले जात नाहीत. अदानी पॉवरच्या सहा शाखाही वीज निर्मिती आणि विक्रीच्या व्यवसायात गुंतलेल्या आहेत.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com