मुंबई: परमबीर सिंह (Parambir Singh)यांच्या सांगण्यावरून अधिकाऱ्याने 5 लाख रुपये सायबर तज्ज्ञांना (cyber expert)दिले आहेत. सिक्रेट सर्व्हिस फंडातून (secret service fund)काढलेले पैसे अधिकाऱ्याने भरल्याची कबुली दिली आहे. तो परमबीर यांच्या कडे 10 वर्षांहून अधिक काळ काम करत आहे. आणि सध्या तो होमगार्ड (home Guard)विभागात काम करीत आहे.
अँटिलिया (Antilia)प्रकरण आणि मनसुख हत्या प्रकरणात NIA ने यांनी दाखल केलेल्या याचिकेत सायबर तज्ज्ञांनी आपले वक्तव्य केले आहे. ज्यामध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जैश-उल-हिंद (Jaish-ul-Hind)या दहशतवादी(Terrorist) संघटनेशी संबंधित अहवालात बदल करण्यासाठी पाच लाख रुपये सायबर तज्ञांना कशा प्रकारे दिले होते, हे सांगितले होते.
त्या सर्व प्रकरणाची पुन्हा तपासणी करण्यासाठी NIA ने परमबीर सिंगच्या अगदी जवळच्या एका अधिकाऱ्याचे मत ही घेतले आहे. त्यामध्ये त्याने कबूल केले की त्याने परमबीर सिंगच्या सांगण्यावरून सायबर तज्ञांना गुप्त सेवा निधीतून पाच लाख रुपये दिले होते.
तसेच, ज्या अधिकाऱ्याने पैसे देण्याचे कबूल केले आहे तो 10 वर्षांपेक्षाही अधिक काळ परमबीरकडे यांचेकडे काम करत आहे. आणि आता तो सध्या होमगार्ड विभागात तैनात आहे. येथे परमबीर सिंह DG पदावरही आहेत. सन 2006 मध्ये, परमबीर सिंह ATS मध्ये होते, त्यावेळी पासून त्याच्याशी संबंधित आहे.
सन 2006 पासून, परमबीर सिंह कोकण (Konkan)परिक्षेत्राचे IG बनले, त्यानंतर ते VIP सुरक्षेत गेले. त्यानंतर एडीजी व एसआरपीएफ होते, तसेच ठाणे पोलीस आयुक्त झाले, एडीजी कायदा व सुव्यवस्था (महाराष्ट्र) नंतर डीजी एसीबी नंतर मुंबई पोलीस आयुक्त आणि नंतर डीजी होमगार्ड या सर्व ठिकाणी अधिकाऱ्याला सर्वत्र घेऊन गेले.
अधिकाऱ्याने NIA ला सांगितले :
अधिकाऱ्याने एनआयएला म्हटले आहे की, ते परमबीर सिंग यांचे वैयक्तिक आयुष्य, आणि त्यांच्या वैयक्तिक फायली आणि त्यांच्या कार्यालयीन कामाव्यतिरिक्त कुटुंबातील सदस्यांची काळजी घेत होते.
NIA ने अधिकाऱ्याला चौकशी केली असता, त्यामध्ये सायबर तज्ज्ञ CP कार्यालयात आला होता का, जिथे त्याला जुन्या जैश-उल-हिंद अहवालाशी बदल करण्यासाठी 5 लाख रुपये देण्यात आले होते. ज्यावर अधिकाऱ्याने NIA ला सांगितले की 3 मार्च रोजी एक व्यक्ती CP च्या चेंबरमध्ये लॅपटॉप घेऊन बसली होती, त्यावेळी मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. पण नंतर समजले की तो एक सायबर तज्ञ आहे. त्यानंतर मला तिथे असलेल्या सायबर तज्ञाला तीन लाख रुपये देण्यास सांगण्यात आले. त्याच वेळी, त्याने तज्ञांना विचारले की हे इतके पैसे पुरेसे आहेत की मी आणखी देऊ? जेव्हा सायबर तज्ज्ञांनी यावर प्रतिसाद दिला नाही, तेव्हा सिंगने मला त्या तीन लाखांमध्ये आणखी दोन लाख देऊन त्या सायबर तज्ञांना पाच लाख रुपये देण्यास सांगितले. त्यानंतर मी सिक्रेट सर्व्हिस फंडातून 5 लाख रुपये काढून सायबर तज्ञांना दिले.
NIA ने या अधिकाऱ्याचे स्टेटमेंट दोनदा घेतले आहे. ज्यांच्याकडून पहिले स्टेटमेंट 24 एप्रिल 2021 रोजी आणि दुसरे स्टेटमेंट 13 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आले. दुसऱ्यांदा स्टेटमेंट घेताना, एनआयएला सिंगचे दोन ईमेल आयडी मिळाले, त्यावेळी एनआयएने या अधिकाऱ्याला परमबीरच्या ठिकाणाबद्दल विचारले ज्यावर त्याने सांगितले की त्याच्या माहितीनुसार परमबीर चंदीगडमध्ये असाव्यते.
त्यानंतर तो पुढे म्हणाला, आयुक्त कार्यालयात (commissioner's office)काम करणाऱ्या एका कॉन्स्टेबलने त्याला एका व्यक्तीस फोन करण्यास सांगितले होते. कारण त्या व्यक्तीकडून सेकंड हँड आयफोन खरीदी करायचा होता. त्यानंतर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात त्याच व्यक्तीने ३ ते ४ आयफोन डीजी होमगार्डच्या कार्यालयात आणले होते. त्यानंतर सीपीसोबत त्यांच्या चेंबरमध्ये सुमारे अर्धा तास बैठक झाली, बैठक संपल्यानंतर ते सिंह यांच्या चेंबरमधून बाहेर आले. मला सांगितले की सिंह सरांनी नवीन आयफोन निवडला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.