चलनविषयक धोरण समितीच्या घोषणेपूर्वी तणाव, शेअर बाजारात घसरण कायम

त्याआधी आज घसरणीला ब्रेक करत सेन्सेक्स 78 अंकांच्या तेजीसह 55,185 वर तर निफ्टी 28 अंकांच्या तेजीसह 16,444 वर उघडला होता
Share Market
Share MarketDainik Gomantak

आज चलनविषयक धोरण समिती ( RBI MPC बैठकीत ) रिझर्व्ह बँकेने घेतलेला निर्णय जाहीर केला जाईल. त्याआधी आज घसरणीला ब्रेक करत सेन्सेक्स 78 अंकांच्या तेजीसह 55,185 वर तर निफ्टी 28 अंकांच्या तेजीसह 16,444 वर उघडला होता मात्र, सुरुवातीची तेजी खंडित झाली आणि पाच मिनिटांतच बाजार लाल चिन्हावर व्यवहार करत आहे.

टाटा स्टील, डॉ रेड्डी आणि स्टेट बँक यांसारखे शेअर तेजीत आहेत. नेस्ले इंडिया, मारुती सुझुकी आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांसारख्या कंपन्यांच्या शेअरवर दबाव दिसून येत आहे.

Share Market
Zomato अन् Blinkit होणार एक! गुंतवणूकदार विकतायेत झोमॅटोचे शेअर्स

बाजारातील जाणकारांच्या मते आरबीआयच्या स्थितीवर आजचा बाजार अवलंबून असेल. आरबीआय आर्थिक धोरण जारी करेल, तर दर वाढीचा निर्णय घेईल. या निर्णयावर बाजारात प्रतिक्रिया उमटतील. व्याजदर वाढतील असा अंदाज प्रत्येकजण आधीच देत असला तरी. आता ते किती असेल यावर बाजाराची प्रतिक्रिया उमटेल. जर सीआरआरमध्ये वाढ झाली तर ती नकारात्मक असेल, असे मत अर्थतंज्ञांनी व्यक्त केले आहे.

Share Market
जगभरात महागाई शिगेला! जागतिक बँकेने जागतिक विकास दराचा अंदाज केला कमी

आज बुधवारी भारतीय शेअर बाजार हिरव्या चिन्हात खुला आहे. मात्र, बाजार उघडल्यानंतर बाजार आपली धार कायम राखू शकला नाही आणि काही वेळातच बाजार लाल चिन्हात गेला. आज गुंतवणूकदारांच्या नजरा रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाकडे असतील. RBI आज पतधोरण जारी करणार असून दरवाढीचा निर्णय घेतला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com