Gautam Adani: अदानींनी 3 कंपन्यांचे शेअर्स ठेवले गहाण, ग्रुप गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा मिळवणार का?

कंपन्यांमधील गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवावा यासाठी गौतम अदानी यांनी आता तीन कंपन्यांचे समभाग गहाण ठेवले आहेत.
Gautam Adani
Gautam Adani Dainik Gomantak

अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर, गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे अदानी समूहाचे मार्केट कॅप निम्म्यावर आले आहे. कंपन्यांमधील गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवावा यासाठी गौतम अदानी यांनी आता तीन कंपन्यांचे समभाग गहाण ठेवले आहेत.

अदानी समूहाच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. अदानी समूहाच्या तीन कंपन्यांनी त्यांचे समभाग बँकांकडे तारण ठेवले आहेत. या बँकांनी अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसला मोठे कर्ज दिले आहे.

Gautam Adani
Sperm Bank: ना रक्त, ना पैसे; चीनच्या एका युनिव्हर्सिटीने विद्यार्थ्यांना केलं अजब दान करण्याचे आवाहन

गौतम अदानी समूहाच्या या कंपन्यांचे शेअर्स एसबीआय कॅप ट्रस्टी कंपनीकडे तारण ठेवण्यात आले आहेत. SBI कॅप ट्रस्टी हे देशातील सर्वात मोठ्या बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे एक युनिट आहे. अदानी पोर्ट्स, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे ​​शेअर्स त्यांच्याकडे तारण असल्याची माहिती त्यांनी मुंबई शेअर बाजाराला दिली आहे.

फ्रेंच ऊर्जा कंपनी टोटल एनर्जीने अदानी समूहाला मोठा धक्का दिला आहे. टोटल एनर्जी ही अदानी समूहातील सर्वात मोठी विदेशी गुंतवणूकदार आहे. टोटल एनर्जीने अदानी समूहाच्या हायड्रोजन प्रकल्पातील गुंतवणूक रोखून धरली आहे. हिंडनबर्ग रिसर्चच्या अदानी समूहाच्या कंपन्यांवरील आरोपांची चौकशी होईपर्यंत आणखी गुंतवणूक करणार नसल्याचे टोटल एनर्जीने म्हटले आहे.

Gautam Adani
Bangladesh President: 1971 च्या युद्धात सक्रिय सहभागी असणारे 'हे' होणार बांगलादेशचे नवे राष्ट्रपती

गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांवरील एकूण कर्ज 3.39 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. हे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या 1% इतके आहे. Nikkei Asia च्या विश्लेषणातून ही माहिती मिळाली आहे. Nikkei च्या माहितीनुसार, शेअर बाजारात सूचीबद्ध गौतम अदानी यांच्या 10 कंपन्यांचे दायित्व 3.39 लाख कोटी रुपये आहे. यामध्ये एसीसी, अंबुजा सिमेंट आणि एनडीटीव्ही व्यतिरिक्त गौतम अदानी समूहाच्या सात कंपन्यांचा समावेश आहे.

तुम्हीही गौतम अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ब्रोकरेज हाऊसने अदानी समूहाच्या तीन कंपन्यांच्या किमतीचे लक्ष्य कमी केले आहे. बाजार तज्ञांनी अदानी पोर्ट्स, अंबुजा सिमेंट आणि ACC वरील किमतीचे लक्ष्य 2-15% ने कमी केले आहे. तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर गौतम अदानी समूहाच्या तिन्ही कंपन्यांचे लक्ष्य कमी करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com