सेन्सेक्स सावरला, 389 अंकांनी वधारला

आशियातील इतर प्रमुख बाजारपेठा ही सुरूवातीच्या तोट्यातून सावरल्या
share market
share marketdainikgomantak
Published on
Updated on

मुंबई: सुरुवातीच्या घसरणीतून सावरताना सोमवारी बीएसई सेन्सेक्स 389 अंकांच्या वाढीसह बंद झाला. इंडेक्स हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिसच्या वाढीसह बाजार तेजीत बंद झाला. तर 30 शेअर्सचा सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यवहारात 1,025 अंकांनी घसरून 54,833.50 वर आला होता. पण त्यानंतर बाजारात पुन्हा तेजी आली शेवटी तो 388.76 अंकांसह 0.70 टक्क्यांच्या वाढीसह 56,247.28 वर बंद झाला. (Sensex rises 389 points after recovering from early losses)

त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजारात (national stock market) निफ्टी 135.50 अंकांनी म्हणजेच 0.81 टक्क्यांच्या वाढीसह 16,793.90 वर बंद झाला. त्यावेळी 50 निफ्टी समभागांपैकी 33 शेअर्स वधारले तर 17 तोट्यात होते. सेन्सेक्सच्या समभागांमध्ये 6.61 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन टाटा स्टीलला (Tata Steel) सर्वाधी त्याचा फायदा झाला. दुसरीकडे, रिलायन्स इंडस्ट्रीजचा (Reliance Industries) समभागही 3.29 टक्क्यांच्या वाढीसह मोठ्या नफ्यात होता.

याशिवाय पॉवर ग्रिड, टायटन, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, एलअँडटी, इन्फोसिस आणि सन फार्मा यांचे समभागही वधारले. दुसरीकडे, डॉ. रेड्डीज सर्वात जास्त 2.81 टक्क्यांनी घसरले. अॅक्सिस बँक, महिंद्रा अँड महिंद्रा बँक आणि एचडीएफसी बँकही तोट्यात दिसत आहे.

share market
अभिमानास्पद! माधबी पुरी बुच बनल्या सेबी च्या पहिल्या महिला प्रमुख

तर आशियातील इतर प्रमुख बाजारपेठा ही सुरूवातीच्या तोट्यातून सावरत नफ्यात बंद झाल्या. जपानचा निक्केई-२२५ ०.२ टक्क्यांनी, चीनचा शांघाय कंपोझिट ०.३ टक्के आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.८ टक्क्यांनी वधारला. हाँगकाँगचा हँग सेंग मात्र 0.2 टक्क्यांनी घसरला.

दरम्यान, यूएस तेल बेंचमार्क 4.7 टक्क्यांनी वाढून तो 95.92 डॉलर प्रति बॅरल आणि जागतिक बेंचमार्क ब्रेंट क्रूड 4.5 टक्क्यांनी वाढून 98.32 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) यांच्यातील युद्धामुळे (Russia-Ukraine War) विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 4,470.70 कोटी रुपयांचे समभाग विकले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com