अभिमानास्पद! माधबी पुरी बुच बनल्या सेबी च्या पहिल्या महिला प्रमुख

माधबी पुरी बुच यांची सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. बाजार नियामकाच्या सर्वोच्च पदावर महिला आणि खासगी क्षेत्रातील व्यक्तीची नियुक्ती होण्याची ही पहिलीच वेळ.
Madhabi Puri Buch chairperson of sebi
Madhabi Puri Buch chairperson of sebiDainik Gomantak
Published on
Updated on

शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाची (sebi) कमान आता एका महिलेच्या हाती असणार आहे. सरकारने सोमवारी सेबीचे नवे अध्यक्ष म्हणून माधबी पुरी बुच यांच्या नावाची घोषणा केली. या पदासाठी पहिल्यांदाच एका महिलेची निवड झाली आहे. आतापर्यंत हे पद अजय त्यागी यांच्याकडे होते. (SEBI President Madhavi Puri Butch)

भारतीय प्रशासकीय सेवेचे (IAS) 1984 बॅचचे हिमाचल प्रदेश केडरचे अधिकारी अजय त्यागी यांची 1 मार्च 2017 रोजी SEBI चे अध्यक्ष म्हणून तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांना सहा महिन्यांसाठी सेवेत मुदतवाढ देण्यात आली. त्यागी यांचा कार्यकाळ ऑगस्ट 2020 मध्ये आणखी 18 महिन्यांनी वाढवण्यात आला होता.

Madhabi Puri Buch chairperson of sebi
EPF आणि PPF या दोन्हींमध्ये गुंतवणूक करावी का? हा आहे तज्ञांचा सल्ला

कोण आहेत माधवी पुरी बुच

SEBI चे होल टाइम मेंबर (WTM) माधबी पुरी बुच यांना यापूर्वी मार्केट रेग्युलेटर SEBI ने स्थापन केलेल्या नवीन तंत्रज्ञान समितीचे प्रमुख म्हणून नामांकित केले होते. बुच (Madhabi Puri Buch) या डब्ल्यूटीएम म्हणून सेबीच्या पहिल्या महिलाच नव्हे तर खाजगी क्षेत्रातील पहिल्या व्यक्ती होत्या. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात आयसीआयसीआय बँकेतून केली. तिने फेब्रुवारी 2009 ते मे 2011 पर्यंत ICICI सिक्युरिटीजमध्ये MD आणि CEO या पदावर काम केले. 2011 मध्ये ती ग्रेटर पॅसिफिक कॅपिटल एलएलपीमध्ये सामील होण्यासाठी सिंगापूरला गेली.

बुच यांची कारकीर्द

कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (DoPT) नुसार, बुच गेल्या वर्षीपर्यंत सेबीमध्ये पूर्णवेळ सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी शांघायमधील न्यू डेव्हलपमेंट बँकेतही काम केले आहे. येथे त्यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली. माधबी पुरी बुच यांनाही बँकिंगचा (Bank) अनुभव आहे.

तीन वर्षांसाठी नियुक्ती

माधबी पुरी बुच यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. अलीकडेच एलआयसीने सेबीकडे आयपीओसाठी कागदपत्रे सादर केली आहेत. आता सेबीच्या मंजुरीनंतर आयपीओ सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात LIC (Lic) शेअर बाजारात लिस्ट होईल असा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com