Indian Railways: ...आता स्वत: पोलिस पोहचणार प्रवाशांच्या सीटपर्यंत'

इंदूरमध्ये (Indore) रेल्वे पोलिसांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनोखी मोहीम सुरु केली आहे.
Railway Police
Railway PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

इंदूरमध्ये (Indore) रेल्वे पोलिसांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनोखी मोहीम सुरु केली आहे. आता प्रवाशांना तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात जावे लागणार नाही. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उत्तम सुरक्षा सुविधा देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. प्रवाशांसाठी (Passengers) राबविण्यात येत असलेल्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती रेल्वे एसपीकडून देण्यात आली आहे. रेल्वेच्या एसपी निवेदिता गुप्ता (Nivedita Gupta) यांनी सांगितले की, 'मोहिमेच्या सुरुवातीला रेल्वे प्रवाशांना त्रासापासून वाचवण्यासाठी सुरक्षेची माहिती देण्यात आली होती.' (In Indore He Railway Police Has launched A Unique Campaign For The Safety Of Passengers)

इंदूरमध्ये रेल्वे पोलिसांनी अनोखी मोहीम राबवली

रेल्वेच्या वतीने नवीन हवालदारांना ट्रेनमधील घटना आणि प्रवाशांवर एफआयआर नोंदवण्यासंदर्भात प्रशिक्षण दिले जात आहे. निवेदिता गुप्ता यांनी पुढे सांगितले की, ''पीडित महिला किंवा तक्रारदार यांना एफआयआर नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात जावे लागते. मात्र रेल्वेने एक नवीन उपक्रम सुरु केला आहे.''

Railway Police
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; आता आरक्षणाशिवाय करा रेल्वे प्रवास

आता पोलिस स्वत: प्रवाशांच्या सीटपर्यंत पोहोचणार

या मोहिमेअंतर्गत आता प्रवाशांना एफआयआर नोंदवण्यासाठी कुठेही जावे लागणार नाही, तर पोलीस स्वत: त्यांच्यापर्यंत पोहोचतील. प्रवाशांना कोचमध्ये उपस्थित असलेल्या पोलीस हवालदाराशी समस्या सांगावी लागेल किंवा मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे पोलिसांना कळवावे लागेल. पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर प्रवाशांच्या समस्या त्यांच्या सीटवरच पोलिस हवालदारामार्फत ऐकून घेतल्या जातील आणि त्यांचा एफआयआरही तिथेच नोंदवला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com