Free Air Travel: ज्येष्ठ नागरिकांसाठी खूशखबर, विमानाने करता येणार मोफत प्रवास; सरकारने केली मोठी घोषणा

Senior Citizens Latest News: आज आम्ही तुम्हाला अशाच एका सुविधेबद्दल सांगणार आहोत, ज्या अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिक मोफत विमानाने प्रवास करु शकणार आहेत.
Free Air Travel
Free Air TravelDainik Gomantak

Senior Citizens Free Air Travel: देशभरात ज्येष्ठ नागरिकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. सरकारपासून रेल्वे आणि बँकांपर्यंत अनेक कामांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सूट मिळते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सुविधेबद्दल सांगणार आहोत, ज्या अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिक मोफत विमानाने प्रवास करु शकणार आहेत. रेल्वेने दिलेल्या सवलतीनंतर आता विमानात मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

राज्य सरकारने ही सुविधा सुरु केली

केंद्रासोबतच राज्य सरकारकडूनही अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष सुविधा सुरु केली असून त्यामध्ये त्यांना विमानाने प्रवास करण्याची सुविधा दिली जात आहे.

Free Air Travel
Railway Concession To Senior Citizen: ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात पुन्हा सवलत, नियम बदलणार!

मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली

माहिती देताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना पुढील महिन्यापासून विमानाने तीर्थयात्रेला जाण्याचा पर्याय उपलब्ध असेल. भिंड येथील संत रविदास यांच्या जयंती आणि चंबळ विभागाच्या विकास यात्रेच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

सरकारी खर्चाने प्रवास करता येईल

या तीर्थ दर्शन योजनेत अनेक ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. यात संत रविदासांच्या जन्मस्थानाचाही समावेश करण्यात आला आहे. या तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक (Senior Citizens) सरकारी खर्चाने तीर्थक्षेत्री जाऊ शकतात.

Free Air Travel
Indian Railways: अश्विनी वैष्णव यांची घोषणा, ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे देणार 'ही' मोठी भेट!

राज्य सरकार सुधारणा करत आहे

यासोबतच माहिती देताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की, भिंडमध्ये सध्या नगरपरिषद आहे. राज्य सरकार नगरपालिका म्हणून अपग्रेड करण्याचे काम करत आहे. यासोबतच शहराला वैद्यकीय महाविद्यालयही मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, 'विकास यात्रा' राज्यातील सर्व वाड्या आणि गावांना भेट देऊन पात्र लोकांना शासकीय योजनांचा लाभ देईल, तसेच विकासात्मक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com