Free Travel Facility For Senior Citizen: ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी, प्रवासादरम्यान...

Free Travel Facility For Senior Citizen: केंद्र आणि राज्य शासनाकडून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना विविध सुविधा पुरविल्या जातात.
Senior citizen
Senior citizenDainik Gomantak
Published on
Updated on

Free Travel Facility For Senior Citizen: केंद्र आणि राज्य शासनाकडून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना विविध सुविधा पुरविल्या जातात.

आता राज्य सरकारकडून आणखी एक मोठी खूशखबर मिळाली आहे. राज्य सरकारने तिकीट दरात कपात केली आहे. यापुढे तुम्हाला प्रवासादरम्यान फक्त निम्मेच भाडे द्यावे लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राज्यातील प्रवाशांना निम्मे भाडे द्यावे लागणार आहे.

आता अर्धे भाडे द्यावे लागेल

ही सुविधा महाराष्ट्र आणि हरियाणा (Haryana) सरकारने सुरु केली आहे. महाराष्ट्रातील महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांसाठी बसच्या तिकीट भाड्यात 50 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.

त्याचबरोबर, ज्येष्ठ नागरिकांनाही ही सुविधा दिली जात आहे. यामध्ये 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळत आहे. त्याचबरोबर राज्यातील 75 वर्षांवरील नागरिकांसाठी बससेवा मोफत आहे.

Senior citizen
Senior Citizen Saving Scheme: ज्येष्ठ नागरिकांसाठी खूशखबर, दरमहा मिळणार 70,500 रुपये; अर्थमंत्र्यांची घोषणा!

बस भाड्यात सवलत

तुम्हाला बस भाड्यात ही सूट मिळेल. राज्य परिवहन महामंडळामार्फत ही सुविधा दिली जात आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत माहिती दिली. यासोबतच हरियाणा सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या तिकिटाचे दरही कमी केले आहेत.

1 एप्रिलपासून ही सुविधा लागू करण्यात आली आहे

ज्येष्ठ नागरिकांच्या भाड्यात 50 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. फक्त हरियाणा राज्यात राहणाऱ्या लोकांनाच याचा लाभ मिळेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बसमध्ये प्रवास करताना तिकीट बुकिंग करताना हरियाणाचे रहिवासी प्रमाणपत्र दाखवावे लागेल. ही सुविधा 1 एप्रिलपासून लागू झाली आहे.

Senior citizen
Senior Citizen Scheme: ज्येष्ठ नागरिकांना मोदी सरकारकडून आनंदाची बातमी, मिळणार मोठा फायदा!

अनेक राज्यांमध्ये मोफत बस प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे

हरियाणात पूर्वी केवळ 60 वर्षांच्या महिलांनाच या सुविधेचा लाभ मिळत होता, परंतु आतापासून 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. दिल्ली आणि पंजाबमधील महिलांसाठी बस प्रवास विनामूल्य आहे. याशिवाय, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये ज्येष्ठ नागरिकांना बस भाड्यातही सवलत दिली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com