अर्थमंत्र्यांची बँकांच्या प्रमुखांसोबत महत्वाची बैठक, या मुद्यांवर होणार चर्चा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) 25 ऑगस्ट 2021 रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांसोबत (Bank CEO) एक बैठक घेणार आहेत
Finance Minister Nirmala Sitharaman will attend meeting of banks head
Finance Minister Nirmala Sitharaman will attend meeting of banks headDainik Gomantak
Published on
Updated on

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) 25 ऑगस्ट 2021 रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांसोबत (Bank CEO) एक बैठक घेऊन देशातील बँकांच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत. तसेच अर्थमंत्री कोरोना महामारीमुळे (COVID-19) प्रभावित अर्थव्यवस्थेला (Indian Economy) चालना देण्याच्या दृष्टीने केलेल्या प्रगतीचा आढावा या बैठकीत अर्थमंत्री चर्चा करणार आहेत. यापूर्वी गेल्या वर्षी मार्च 2020 मध्ये महामारी सुरू झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि सरकारी बँकांचे प्रमुख यांच्यात एक बैठक झाली होती .(Finance Minister Nirmala Sitharaman will attend meeting of banks head)

ही बैठक एका दृष्टीने खूप महत्वाची मानली जात आहे कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्यासोबतची बैठक ही मागणी आणि उपभोग वाढवण्यासाठी बँकिंग क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेऊन त्यावर योग्य ती पावले उचलली जाणार आहेत.

Finance Minister Nirmala Sitharaman will attend meeting of banks head
बँकेत नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे

तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या बैठकीत बँकांची स्थिती, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घोषित केलेल्या पुनर्रचना योजना भाग दोन आणि त्यासोबतच रिझर्व्ह बँकैचे या नवीन नियमांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या बैठकीत उत्पादक क्षेत्रांना कर्ज वाढवण्यावर बँकांना सूचना दिल्या जाऊ शकतात असेहि बोलले जात आहे. त्याचबरोबर या बैठकीत अर्थमंत्री ज्या बँकांचे नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स (एनपीए) अधिक आहेत अशा बँकांचा सविस्तर आढावा घेणार आहेत तसेच बँकांच्या विविध सुधारणा आणि योजना याबातही त्या चर्चा करतील.

अर्थमंत्र्यांची ही बैठक मुंबईत होणार असून विशेष म्हणजे, सरकारने घेतलेल्या अनेक पावलांमुळे, 31 मार्च 2021 पर्यंत बँकांची एनपीए 6,16,616 कोटी रुपयांवर आली (तात्पुरती आकडेवारी). 31 मार्च 2020 रोजी हा आकडा 6,78,317 कोटी रुपये होता. तर यापूर्वी 31 मार्च 2019 रोजी एनपीए 7,39,541 कोटी रुपये होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com