State Bank of India
State Bank of IndiaDainik Gomantak

SBI Home Loan: 75 व्या स्वातंत्र्यदिनी SBI देत आहे खास ऑफर; असा करा अर्ज

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना भाड्यातून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गृह कर्जावर शून्य प्रक्रिया शुल्क (Zero Processing Fees) देत आहे.
Published on

भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या (75th Independence Day) निमित्ताने, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना भाड्यातून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गृह कर्जावर शून्य प्रक्रिया शुल्क (Zero Processing Fees) देत आहे. एसबीआयने एका ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे. एसबीआयने ट्विटमध्ये लिहिले की, "हा स्वातंत्र्य दिन, तुमच्या स्वप्नांच्या घरात पाऊल टाका, आता शून्य प्रोसेसिंग फीसह होम लोनसाठी अर्ज करा. (SBI is offering special offers on home loans on 75th Independence Day)

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयकडून महिलांना गृहकर्जावर अतिशय आकर्षक सवलत सुविधेचा देखील लाभ दिला जात आहे. महिलांना गृहकर्ज सुविधेअंतर्गत व्याजदरात 5 बेसिस पॉइंटच्या सूटचा लाभ दिला जात आहे.

State Bank of India
Vodafone-Idea बंद झाली तर सरकारला 1.60 लाख कोटी रुपयांचा फटका

त्याच वेळी, जर तुम्हाला एसबीआयच्या योनो सेवेअंतर्गत (SBI’s YONO service) गृहकर्ज घ्यायचे असेल, तरीही तुम्हाला 5 बीपीएस व्याज सवलतीचा लाभ मिळेल. एसबीआय होम लोन व्याज दर 6.70 टक्के आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना 6.70 टक्के व्याज दराने 30 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज देत आहे. गृहकर्जावर 30 लाख ते 75 लाखांपर्यंतच्या 6.95 टक्के व्याज दर असेल. 75 लाखांवरील गृहकर्जावरील व्याजदर फक्त 7.05 टक्के असेल.

अर्ज कसा करावा?

आझादी का अमृत महोत्सव मोहिमेअंतर्गत, एसबीआयच्या या आकर्षक गृहकर्जाची सुविधा 15 ऑगस्टला मिळू शकते.याशिवाय एसबीआयने 7208933140 हा क्रमांक जारी केला आहे. तुम्ही गृहकर्जासाठी या दिलेल्या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकतात.

बँकेच्या ग्राहकाने कर्ज घेताना कोणत्या प्रकारच्या अडचणी येत आहेत हे सांगितले आणि बँक कोणत्या आधारावर कर्ज देत नाही. यानंतर, एसबीआयने ट्विट करून माहिती दिली आहे की कर्ज मंजुरी अनेक घटकांवर अवलंबून असते, ज्यात उत्पन्न, माल तारण, चालू कर्ज, क्रेडिट इतिहास, फिजिबिलिटी इत्यादींचा समावेश आहे. म्हणजेच, जेव्हाही बँक कर्ज देते, तेव्हा त्यात या गोष्टींची काळजी घेतली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com