SBI FD Interest Rates: तुम्ही देखील स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. एसबीआयने पुन्हा एकदा व्याजदरात वाढ केली आहे. बँकेकडून व्याजदरात 75 बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तथापि, सर्व ग्राहकांना त्याचा लाभ मिळणार नाही. नवीन FD व्याजदर बँकेने 15 मे 2024 पासून लागू केला आहे. बँकेने लागू केलेला नवीन FD व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेवर लागू होईल.
बँकेच्या वेबसाइटनुसार, 46 दिवसांपासून ते 179 दिवसांपर्यंतच्या मुदतीच्या एफडीवरील व्याजदरात 75 बेस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. ते पूर्वीच्या 4.75% वरुन 5.50% पर्यंत वाढले आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्याच कालावधीत 5.25% वरुन 6% पर्यंत व्याज दिले जाईल.
दरम्यान, SBI ने 180 दिवसांपासून 210 दिवसांच्या कालावधीसाठी सामान्य ग्राहकांसाठी व्याजदर 5.75% वरुन 6% पर्यंत 25 bps ने वाढवला आहे. बँकेने 211 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD चे दर सामान्य ग्राहकांसाठी 6% वरुन 6.25% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.50% वरुन 6.75% वाढवले आहेत.
बँकेने 7 ते 45 दिवसांच्या बल्क डिपॉझिटवरील व्याजदरात 25 बेस पॉइंट्सने वाढ केली आहे. यामुळे सामान्य ग्राहकांसाठी दर 5% वरुन 5.25% पर्यंत वाढला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेने त्याच कालावधीसाठी व्याजदर 5.50% वरुन 5.75% केला आहे. 46 ते 179 दिवसांच्या मुदतीच्या FD वर, सामान्य नागरिकांना 5.75% ऐवजी 6.25% पर्यंत व्याजदर मिळेल. या कालावधीसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 6.25% वरुन 6.75% करण्यात आला आहे.
बँकेने सर्वसामान्य ग्राहकांसाठी 10 bps ची मुदत 180 दिवसांवरुन 210 दिवसांपर्यंत वाढवली आहे. तो 6.50% वरुन 6.60% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7% वरुन 7.10% झाला आहे. बँकेने एक ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याजदर 6.80% वरुन 7% पर्यंत 20 bps ने वाढवले आहेत. दोन वर्षापासून 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी, बँकेने सामान्य ग्राहकांसाठी दर 6.75% वरुन 7% पर्यंत वाढवला आहे. बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 7.25% वरुन 7.50% केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.