Samsung Display Change Scheme: सॅमसंगने (Samsung) आपल्या स्मार्टफोन वापरकर्त्यांना एक मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. जर तुम्ही देखील सॅमसंग मोबाईल वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. सॅमसंग एका योजनेअंतर्गत आपल्या काही स्मार्टफोन्सचे डिस्प्ले मोफत बदलत आहे.काही सॅमसंग स्मार्टफोनमध्ये डिस्प्लेशी संबंधित समस्या होत्या. अनेक वापरकर्त्यांनी Samsung Galaxy S20 मध्ये फोनच्या डिस्प्लेवर उभ्या हिरव्या रेषेबद्दल तक्रार केली होती, त्यानंतर कंपनीने आपली चूक मान्य केली आणि Samsung Galaxy S20 वापरकर्त्यांना विनामूल्य डिस्प्ले बदलण्याची ऑफर दिली.
डिस्प्ले फ्री मध्ये बदलेल
Galaxy S20चा डिस्प्ले विनामूल्य बदलला जाईल. व्हिएतनामी प्रकाशनानुसार, Samsung ने Galaxy S20चा व्हिएतनाममध्ये विनामूल्य डिस्प्ले बदलण्याची योजना (Samsung Galaxy S20 Series) सुरू केली आहे. या प्रोग्राममध्ये सॅमसंग गॅलेक्सी S20, Galaxy S20 Ultra आणि Galaxy S20 Plus स्मार्टफोनचा डिस्प्ले मोफत बदलला जात आहे. या योजनेअंतर्गत, मोबाईल स्क्रीन फक्त एकदाच बदलली जाईल. याशिवाय, जर फोन खराब झाला असेल किंवा त्याची वॉरंटी संपली असेल, तर तुम्ही ही योजना वापरू शकणार नाही. अंतिम मुदतीबद्दल बोलायचे तर ही योजना या वर्षाच्या अखेरपर्यंत (३१ डिसेंबरपर्यंत) चालणार आहे. या योजनेत, तुम्ही 2022 मध्येच स्क्रीन बदलू शकाल.
Samsung Galaxy S20 Series
सॅमसंगकडून येणारी एस सीरीज ही कंपनीची सर्वात प्रीमियम सीरीज आहे. या प्रीमियम सीरिज अंतर्गत, 2020 मध्ये सॅमसंगने भारतासह जागतिक बाजारपेठेत Galaxy S20 सिरीज लॉन्च केली. Samsung Galaxy S20 सीरीजमध्ये Samsung Galaxy S20, Samsung Galaxy S20+ आणि Samsung Galaxy S20 Ultra हे स्मार्टफोन बाजारात लॉन्च झाले होते, तेव्हापासून या स्मार्टफोन्समध्ये डिस्प्ले समस्या येत होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.