2499 रुपयात Noise ColorFit Icon 2 नवीन स्मार्टवॉच भारतात लॉन्च

भारतीय बाजारपेठेत एक नवीन स्मार्टवॉच लाँच करण्यात आली आहे. नॉईज कलरफिट आयकॉन 2 असे त्या घड्याळाचे नाव आहे.
Noise ColorFit Icon 2
Noise ColorFit Icon 2Twitter/@gonoise
Published on
Updated on

Noise ColorFit Icon 2: भारतीय बाजारपेठेत एक नवीन स्मार्टवॉच लाँच करण्यात आली आहे. नॉईज कलरफिट आयकॉन 2 असे त्या घड्याळाचे नाव आहे. त्याची किंमत 2499 रुपये आहे. यामध्ये फिटनेसशी संबंधित अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. घड्याळाच्या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाले तर, मोठा डिस्प्ले, मजबूत बॅटरी बॅकअप, 60 पेक्षा जास्त मोड आणि वॉटर प्रोटेक्शन यासाठी IP67 प्रमाणित रेटिंग देण्यात आली आहे. यात हार्ट रेट मॉनिटर्स देखील आहेत. जी फायरबोल्ट सारख्या स्मार्टवॉचला स्पर्धा देत आहे.

नॉइज कलरफिट आयकॉन 2 चे वैशिष्ट्ये

Noise ColorFit Icon 2 च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात 1.8-इंचाचा वक्र डिस्प्ले आहे. त्याचे रिझोल्यूशन 240 x 280 पिक्सेल आहे. हे 500 nits च्या शिखर ब्राइटनेससह येते. तसेच यामध्ये कस्टमाइज वॉच फेस देण्यात आले आहेत. कंपनीने यामध्ये स्क्वेअर डायल वापरला आहे, ज्यामध्ये एक गोलाकार बटण देखील दिले आहे आणि ते उजव्या बाजूला आहे.

Noise ColorFit Icon 2
Tecno CAMON 19 Pro जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

नॉइज कलरफिट आयकॉन 2 फिचर्स

नॉईज कलरफिट आयकॉन 2 मध्ये हार्ट बिट सेंसर, एसपीओ 2 सेन्सर, स्लीप ट्रॅकिंग वैशिष्ट्ये आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या वेअरेबल डिव्हाईसमध्ये ब्लूटूथ कॉलिंगला सपोर्ट करण्यात आला आहे, जो ड्रायव्हिंग आणि इतर ठिकाणी खूप उपयुक्त ठरतो. यासोबतच क्विक डायल, कॉल हिस्ट्री आणि फेव्हरेट कॉन्टॅक्ट्समध्ये सेव्ह करण्याचा पर्याय आहे.

नॉइज कलरफिट आयकॉन 2 बॅटरी लाइफ

या स्मार्टवॉचमध्ये AI व्हॉईस असिस्टंटची वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तसेच, यात कॅमेरा आणि म्युझिक कंट्रोल फीचर्स आहेत. यात नोटिफिकेशन डिस्प्ले आणि इनबिल्ट गेम्सचा पर्यायही आहे. यात 260 mAh ची बॅटरी आहे. ज्यात 4 दिवसांची बॅटरी लाइफ मिळेल.

Noise ColorFit Icon 2
Nokia T20: नोकिया टॅबलेट मोठा डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह लॉन्च

नॉइज कलरफिट आयकॉन 2 कलर व्हेरियंट

नॉइज कलरफिट आयकॉन 2 च्या कलर वेरिएंटबद्दल बोलायचे झाल्यास, यात जेट ब्लॅक, सिल्व्हर ग्रे, रोज पिंक आणि डीप वाईन कलर उपलब्ध आहेत. ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटशिवाय, हे स्मार्टवॉच फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. भारतीय बाजारपेठेत परवडणाऱ्या विभागात अनेक स्मार्ट घड्याळे आहेत. फायरबोल्ट व्यतिरिक्त यामध्ये अनेक चांगले पर्याय आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com