'Samsung Galaxy S26 Ultra'ची लाँचिंग डेट लीक, 'या' दिवशी होणार लाँच; धमाकेदार अपग्रेडसह मिळणार 'हे' फीचर्स

Samsung Galaxy S26 Ultra Launch Date Leak: जगभरातील स्मार्टफोन प्रेमी ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो सॅमसंगचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन Samsung Galaxy S26 Ultra लवकरच बाजारात धडकणार आहे.
Samsung Galaxy S26 Ultra
Samsung Galaxy S26 UltraDainik Gomantak
Published on
Updated on

जगभरातील स्मार्टफोन प्रेमी ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो सॅमसंगचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन Samsung Galaxy S26 Ultra लवकरच बाजारात धडकणार आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार, सॅमसंग आपली ही नवी मालिका जानेवारीमध्येच लॉन्च करत असे, मात्र यावेळेस कंपनीने आपली रणनीती बदलल्याचे दिसत आहे. ताज्या लीक्सनुसार, सॅमसंग आपली 'S26' सिरीज फेब्रुवारी २०२६ मध्ये एका भव्य 'Galaxy Unpacked' इव्हेंटमध्ये सादर करणार आहे. यामध्ये विशेषतः एआय (AI) फीचर्सवर अधिक भर दिला जाणार असल्याची चर्चा आहे.

२५ फेब्रुवारीला होणार 'ग्रँड' लॉन्च

प्रसिद्ध टिपस्टर 'Ice Universe' ने दिलेल्या माहितीनुसार, सॅमसंग २५ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे आपला 'Galaxy Unpacked' इव्हेंट आयोजित करेल.

गेल्या काही वर्षांपासून सॅमसंगने आपली लॉन्च टाइमलाइन जानेवारीमध्ये ठेवली होती, परंतु Galaxy S26 साठी यात बदल करण्यात आला आहे. नवीन प्रगत एआय (Artificial Intelligence) फीचर्स समाकलित करण्यासाठी सॅमसंगला थोडा जास्त वेळ हवा असल्याने, लॉन्च महिना फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Samsung Galaxy S26 Ultra
Nightclubs In Goa: धोरण नाही तर गोव्यात 200 बेकायदेशीर 'नाईट क्‍लबस्‌' उभे झाले कसे? सावियो रॉड्रिगीस यांचा सवाल

विक्री कधी सुरू होणार?

सॅमसंगच्या विक्रीच्या जुन्या पॅटर्ननुसार, अनपॅक्ड इव्हेंटनंतर साधारणतः १४ ते १६ दिवसांनी फोन विक्रीसाठी उपलब्ध होतो. त्यानुसार, १३ मार्च २०२६ च्या आसपास Galaxy S26 Ultra जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी येऊ शकतो.

सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे, कोरीयन मीडिया रिपोर्ट्सनुसार सॅमसंग या मालिकेच्या किमतीत कोणतीही वाढ करणार नाही. Galaxy S26 Ultra ची सुरुवातीची किंमत १,२९९ डॉलर्स (सुमारे १.०८ लाख रुपये) राहण्याची शक्यता आहे. वाढत्या मेमरी किमतींनंतरही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने किमती स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

Samsung Galaxy S26 Ultra
Goa Nightclub Fire: सगळंच बेकायदेशीर! बर्च क्लबची जागा होती वस्तीसाठीचा 'सेटलमेंट झोन'; मिठागराचा भाग CRZ मध्ये, प्रशासनाला धक्का

यावेळी Galaxy S26 Ultra चार नवीन आणि आकर्षक रंगांमध्ये पाहायला मिळेल. रिपोर्ट्सनुसार, कंपनी हा फोन Black Shadow, White Shadow, Galactic Blue आणि UltraViolet या विशेष रंगांमध्ये सादर करणार आहे. या रंगांमध्ये एक खास 'डेप्थ इफेक्ट' दिला जाणार असून, त्यामुळे फोनचा लूक अधिक प्रीमियम आणि वेगळा वाटेल. याशिवाय, सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवर काही 'एक्सक्लुझिव्ह' कलर ऑप्शन्स देखील उपलब्ध करून दिले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com