Manish Jadhav
मुकेश अंबानींची कंपनी जिओने डेटाच्या किमती कमी करुन टेलिकॉम सेक्टरमध्ये खळबळ उडवून दिली होती. याच धर्तीवर आता कंपनी AI मध्ये स्प्लॅश बनवण्याच्या तयारीत आहे.
रिलायन्स जिओ टेक कंपनी Nvidia सोबत भागीदारीत नवीन AI मॉड्यूल तयार करण्याची योजना आखत आहे. वापरकर्त्यांना परवडणारी आणि वैयक्तिक AI-A-A सेवा आणि AI एजंट ऍप्लिकेशन सारख्या सुविधा पुरवल्या जाऊ शकतात.
पायाभूत सुविधांच्या बाबतीत, RIL आपल्या उच्च श्रेणीतील ब्लॅकवेल GPUs सुरक्षित करण्यासाठी Nvidia सोबत भागीदारी केल्यानंतर भारत AI मिशनमध्ये सहभागी होणार आहे.
ET रिपोर्टनुसार, जिओचे उद्दिष्ट स्टार्टअप्स आणि संशोधकांना GPU-एज-ए-सर्व्हिस प्रदान करण्याचे आहे.
रिपोर्ट्सनुसार, Jio ने वापरकर्त्यांना त्यांच्या गरजा आणि आवडीनुसार AI सुविधा देण्याचा प्लॅन आखला आहे. त्यामुळे, कंपनी स्वस्त AI साठी आवश्यक असलेल्या गोष्टींवर काम करत आहे, जसे की, उपकरणे, डेटा आणि हाय-स्पीड ब्रॉडबँड. Jio Platforms Nvidia सोबत रिटेल, हेल्थकेअर, कृषी आणि शिक्षण क्षेत्रात एआयच्या वापरावर लक्ष्य केंद्रित करणार आहे.
कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जिओने ज्या प्रकारे परवडणारा डेटा उपलब्ध करुन दिला. याच धर्तीवर AI सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्लॅन आहे.