Manish Jadhav
जर तुम्ही 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवा टॅबलेट (Tablet) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी HMD T21 टॅब बाजारात लॉन्च करण्यात आला आहे.
दमदार फीचर्स आणि परवडणाऱ्या किमतीसह हा टॅब ग्राहकांना आकर्षित करत आहे. चला, या टॅबलेटच्या 8 प्रमुख वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया:
HMD T21 टॅब 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध झाल्याने कमी बजेटमध्ये चांगला टॅबलेट शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरला आहे.
या टॅबमध्ये 2K रिझोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामुळे तुम्हाला फोटो, व्हिडिओ आणि वेबपेजेस पाहताना उत्कृष्ट व्हिज्युअल अनुभव मिळेल.
HMD T21 टॅबला आय प्रोटेक्शन सर्टिफिकेशन (Eye Protection Certification) मिळाले आहे. याचा अर्थ, जास्त काळ टॅब वापरतानाही तुमच्या डोळ्यांवर कमी ताण येईल, जे विद्यार्थ्यांसाठी आणि वाचकांसाठी फायदेशीर आहे.
या टॅबमध्ये 8200 mAh ची शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे. यामुळे तुम्ही दीर्घकाळ व्हिडिओ पाहू शकता, गेम खेळू शकता किंवा काम करु शकता, बॅटरी लवकर संपण्याची चिंता राहणार नाही.
HMD T21 मध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आहेत, ज्यामुळे आवाजाचा अनुभव उत्कृष्ट मिळतो. तसेच, या टॅबवर तुम्ही नेटफ्लिक्स (Netflix) वर HD कंटेंट स्ट्रीम करु शकाल, जे मनोरंजनासाठी उत्तम आहे.
या टॅबला ॲक्टिव्ह पेनचा सपोर्ट आहे. यामुळे नोट्स घेणे, ड्रॉइंग करणे किंवा डिझाईन करणे अधिक सोपे आणि सोयीस्कर होईल, जे विद्यार्थ्यांसाठी आणि क्रिएटिव्ह प्रोफेशनल्ससाठी उपयुक्त ठरु शकते.