Recession In India: देशात मंदी येण्याची शक्यता, मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली भीती

जागतिक आर्थिक मंदीचा नागरिकांना फटका बसू नये यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत.
 नारायण राणे
नारायण राणेDainik Gomantak
Published on
Updated on

जून महिन्यात देशात मंदी येण्याची भीती केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे. जागतिक आर्थिक मंदीचा नागरिकांना फटका बसू नये यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. अशी माहिती नारायण राणे यांनी पुण्यात दिली.

सध्या सारं जग आर्थिक मंदीच्या विळख्यात सापडलंय. मंदीचा तडाखा भारतालाही बसू शकतो. असे राणे म्हणाले. पुण्यात पहिल्या G20 इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपच्या (IWG) बैठकीचे उद्घाटन केल्यानंतर राणे पत्रकारांशी बोलत होते.

 नारायण राणे
Watch Video: हैद्राबादमध्ये 'सैराट'सारखी घटना, भावांकडून बहिणीच्या पतीचा भर रस्त्यात खून

सध्या विविध विकसित देश मंदीचा सामना करत आहेत. जूननंतर मंदी येण्याची शक्यता आहे. देशातील नागरिकांना मंदीचा फटका बसू नये यासाठी केंद्र आणि पंतप्रधान मोदी प्रयत्नशील आहेत. असे नारायण राणे म्हणाले.

भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांना याचा फटका बसू नये यासाठी प्रयत्न करत आहेत. रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगांना चालना देण्यात येत असल्याचेही राणे यावेळी म्हणाले. दीर्घकालीन आणि शाश्वत आर्थिक वाढीसाठी जी-20 बैठक महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत G20 चे अध्यक्षपद भूषवणार आहे. दरम्यान, नारायण राणेंच्या वक्तव्यामुळे भारताचं टेंशन वाढलं आहे.

 नारायण राणे
Ganga Vilas: पंतप्रधानांनी उद्घाटन केलेले जगातील सर्वात मोठे क्रूझ बिहारमध्ये अडकले

G-20 च्या इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपच्या बैठकीत भारताच्या नेतृत्वाखाली इन्फ्रास्ट्रक्चर अजेंडा 2023 वर चर्चा केली जाणार आहे. यामध्ये IWG सदस्य देश आणि अतिथी देश आणि भारताने आमंत्रित केलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे 65 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील यांच्या सह-अध्यक्षतेखाली दोन दिवसीय IWG बैठक आयोजित केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com