Ganga Vilas: पंतप्रधानांनी उद्घाटन केलेले जगातील सर्वात मोठे क्रूझ बिहारमध्ये अडकले

गंगा नदीत पाणी कमी असल्याने किना-यावरच क्रूझसाठी अडचण निर्माण झाली आहे.
Ganga Vilas
Ganga VilasDainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते तीन दिवसांपूर्वी जगातील सर्वात मोठ्या गंगा विलास क्रूझचे (Ganga Vilas Cruise) उद्घाटन करण्यात आले. वाराणसीहून डिब्रुगडला निघालेले गंगा विलास क्रूझ छप्रा, बिहारमध्ये अडकले आहे. गंगा नदीत पाणी कमी असल्याने किना-यावरच क्रूझसाठी अडचण निर्माण झाली आहे.

दरम्यान, याची माहिती प्रशासनाला मिळाली असून, एसडीआरएफची टीम छोट्या बोटीद्वारे क्रूझच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.

Ganga Vilas
Supreme Court: लायब्ररीत सापडलेल्या पुस्तकासाठी प्राचार्यांना अटक करायची? SC ने MP पोलिसांना फटकारले

नदीत पाणी कमी असल्याने बोट किनाऱ्यावर न घेऊन जाता नदीच्या मध्यभागी बोट थांबवण्यात आली. पर्यटकांना छोट्या बोटीतून चिरंद येथे आणण्यात आले.

क्रूझ अडकलेले नाही, खबरदारीचा उपाय म्हणून किना-यावर कमी पाणी असल्याने नदीच्या मधोमध क्रूझ थांबवण्यात आले आहे. पर्यटकांना एका बोटीच्या मदतीने किनाऱ्यावर आणण्यात आले. अशी माहिती छप्रा येथील एका अधिकाऱ्याने दिली आहे.

गंगा विलास क्रूझला शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. गंगा विलास क्रूझ काशी ते दिब्रुगड दरम्यान जगातील सर्वात लांब नदीच्या पाण्याचा प्रवास करणार आहे.

Ganga Vilas
BJP Leader: 'या' भाजप नेत्यावर चालणार बलात्काराचा खटला, SC म्हणाले- तुम्ही चुकीचे नसाल...

बिहारमधील (Bihar) एकूण सहा ठिकाणी ही क्रूझ थांबणार असून तेथे पर्यटक पर्यटनस्थळांना भेट देतील.

क्रूझचा प्रवास सुरळीत आणि जलद होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एक नोडल अधिकारीही तैनात करण्यात आला आहे. क्रूझमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीटाची किंमत 25 हजार रुपये आहे. यामध्ये प्रवास करण्यासाठी एकूण 51 दिवसांच्या प्रवासासाठी 20 लाख रुपये खर्च करावे लागतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com