Reserve Bank of India: तुम्ही देखील कोणत्याही बँक किंवा NBFC कडून गृहकर्ज घेतले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. घर बांधण्यासाठी किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी कर्ज घेणे सामान्य आहे.
मात्र कर्जाची परतफेड केल्यानंतर अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये ग्राहकांना मालमत्तेची कागदपत्रे परत मिळवण्यासाठी अनेक फेऱ्या माराव्या लागल्या.
नुकतेच बँकेतून मालमत्तेची कागदपत्रे हरवल्याची घटनाही समोर आली आहे. अशीच प्रकरणे समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने नवा आदेश जारी केला आहे.
RBI ने बँका आणि NBFC साठी नवीन नियम जारी केले आहेत. कर्जाची पूर्ण परतफेड केल्याच्या 30 दिवसांच्या आत सर्व कागदपत्रे रिलीज करावीत, असे सेंट्रल बँकेच्या आदेशात म्हटले आहे. या कालावधीनंतर बँक किंवा NBFC द्वारे दस्तऐवज जारी केल्यास, बँकेला दंड भरावा लागेल.
नवीन नियम 1 डिसेंबर 2023 पासून लागू होणार आहे. बँक (Bank) किंवा एनबीएफसीकडून कागदपत्रे देण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन 5 हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असे आदेशात सांगण्यात आले. दंडाची रक्कम संबंधित मालमत्ताधारकाला भरावी लागेल.
आरबीआयने असेही म्हटले होते की, जर कर्जदाराच्या मालमत्तेची कागदपत्रे हरवली तर बँकेने ग्राहकाला कागदपत्रांच्या डुप्लिकेट प्रती मिळवण्यासाठी मदत करावी लागेल. कर्जाची परतफेड केल्यानंतर जंगम मालमत्तेची कागदपत्रे बँकेने परत करणे आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.