UPI Lite Limit: UPI वापरकर्त्यांसाठी RBI ची मोठी घोषणा, पेमेंट करण्यासाठी...!

रिझर्व्ह बँकेने UPI Lite वापरकर्त्यांसाठी व्यवहार मर्यादा 200 रुपयांवरुन 500 रुपयांपर्यंत वाढवली आहे.
UPI Payment
UPI PaymentDainik Gomantak
Published on
Updated on

UPI Lite Limit: तुम्ही UPI यूजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँकेने UPI Lite वापरकर्त्यांसाठी व्यवहार मर्यादा 200 रुपयांवरुन 500 रुपयांपर्यंत वाढवली आहे.

UPI Lite सप्टेंबर 2022 मध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि RBI द्वारे सादर करण्यात आला. हे UPI पेमेंट प्रणालीचे स‍िंपलीफाइड व्हर्जन आहे.

मर्यादा 200 रुपयांवरुन 500 रुपये झाली

UPI लाइट या उद्देशासाठी सुरु करण्यात आले होते, जेणेकरुन बँकेकडून (Bank) प्रक्रिया अयशस्वी झाल्यास वापरकर्त्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागू नये. जर तुम्ही UPI वापरकर्ते असाल तर तुम्ही UPI Lite वापरु शकता.

UPI वरुन दररोज व्यवहारांची मर्यादा एक लाख रुपये आहे. दुसरीकडे, UPI Lite वापरकर्ते कमाल 500 रुपये प्रति व्यवहार करु शकतात. यापूर्वी ही मर्यादा 200 रुपये होती.

UPI Payment
RBI Governor Shaktikanta Das: RBI गव्हर्नरांनी 2000 च्या नोटेबाबत दिली मोठी अपडेट, सरकारने का घेतला हा निर्णय?

याशिवाय आरबीआयकडून सांगण्यात आले की, यूपीआय लाइटद्वारे निअर-फील्ड तंत्रज्ञानाचा वापर करुन यूपीआयमध्ये ऑफलाइन पेमेंट सुरु केले जाईल. MPC मध्ये घेतलेल्या निर्णयाबद्दल माहिती देताना,

RBI गव्हर्नर म्हणाले की, वापरकर्त्यांसाठी डिजिटल पेमेंटचा अनुभव वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रस्ताव आहे. UPI Lite द्वारे ऑफलाइन पेमेंट करता येते. दास यांनी सांगितले की, या उपक्रमानंतर देशात डिजिटल पेमेंटची पोहोच आणखी वाढेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com